शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांकडून कचरा भेट

By admin | Updated: May 23, 2017 01:32 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी विभागीय कार्यालयावर धडक देत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कचऱ्याचा बॉक्स भेट दिला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना फेरीवाल्यांचा प्रश्न असो की कचऱ्याचा शिवसेनाच आक्रमक होऊन आंदोलन करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहर स्वच्छतेच्या मानांकनात घसरण झाल्याने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेनेवर आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेचे सभापती रमेश म्हात्रे यांनी मागील स्थायी समितीच्या सभेत प्रशासनावर तोफ डागत घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या आंदोलनात शिवसैनिकांनी डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ६९ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ शाखाप्रमुख नाईक यांच्यासह विभागप्रमुख कुणाल ढापरे, विशाल कराळे, युवाशाखा अधिकारी सूरज पटवा आणि सचिन कुलकर्णी, विशाल सरडे, पार्थ रामाणी आदींनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कचऱ्याने भरलेला बॉक्स भेट दिला. यापुढे जर दररोज कचरा साफ केला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा दिला. दरम्यान कचरा उचलला जात नाही या शिवसेनेच्या आरोपाचा अधिकाऱ्यांनी इन्कार केला. फेरीवाला अतिक्रमणाविरोधात गेल्या आठवड्यात युवासेना आक्रमक झाली होती. रविवारी पुन्हा एकदा शिवसेनेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यासंदर्भात शाखाप्रमुख नाईक यांच्याशी संपर्क साधला असता सत्ता कोणाचीही असो नागरीकांना होणाऱ्या अडचणी सोडवणे हेच शिवसैनिकांचे काम आहे आणि ते शेवटपर्यंत करीत राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.