शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची खिल्ली उडवणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

ठाणे : कचरा उचलण्यास नकार देऊन नागरिकांची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी कचराकुंडीत जमा झालेला ...

ठाणे : कचरा उचलण्यास नकार देऊन नागरिकांची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी कचराकुंडीत जमा झालेला कचरा दुचाकीवरून नेऊन सोमवारी ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला.

दरम्यान, ठाणे महापालिकेमध्ये कचऱ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असून ही समस्या निकाली न लावल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकू, असा इशारा पठाण यांनी दिला. मुंब्रा येथे अभिषेक कन्स्ट्रक्शन आणि अमृत एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार कचरा उचलतात. किस्मत कॉलनी आणि दारुल फलाड परिसरात कचऱ्यातील लाकूड आणि गाद्या आदी न उचलता ते कचराकुंडीत किंवा आजूबाजूला फेकून देतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही कचरा उचलण्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी पठाण यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात पठाण यांच्यासमोरच दूरध्वनीवरून अमृत एंटरप्रायजेस कार्यालयात संपर्क साधण्यात आला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी कचरा उचलण्यास तर नकार दिलाच; शिवाय, तक्रार करणाऱ्यांची खिल्ली उडविली. त्यामुळे संतापलेल्या पठाण यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास थेट किस्मत कॉलनी परिसर गाठला. त्या ठिकाणी अमृत एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकीची कचऱ्याची गाडी उभी होती. या गाडीतील कर्मचारी कचरा उचलत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पठाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाच कचरा गोणींमध्ये भरून दुचाकीवरून रेतीबंदर येथील अमृत एंटरप्रायझेस आणि अभिषेक कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन ओतला. कचऱ्याबाबतीत ठाणे महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांना मलिदा मिळत असल्याने ते अशा ठेकेदारांवर कारवाई करीत नाहीत. आता आपण या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असून कचरा उचलण्याची ही चुकीची पद्धत संपुष्टात न आल्यास घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन आपण कचरा फेकणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

.......

वाचली