शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन तलाव की डम्पिंग?

By admin | Updated: March 21, 2017 01:41 IST

पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश असतानाही निर्माल्य, घरातील कचराही तलावात सर्रासपणे टाकला जात आहे. तेथील पाणी प्रदूषित झाले असून ते जलचरांच्या जीवावर बेतत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल येथील रहिवाशांकडून होत आहे.केडीएमसीच्या या गणेश विसर्जन तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले. घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. परंतु, सध्या सार्वजनिक मंडळाचे तसेच मोठ्या उंचीच्या गणपती मूर्तींचेही येथे विसर्जन होते. केवळ गणेश चतुर्थीला तलावाची स्वच्छता केली जाते. मात्र, त्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होते. तलावाच्या बाहेर निर्माल्य कलश आहे. परंतु, त्याचा वापर करण्याऐवजी निर्माल्य सर्रासपणे तलावात टाकले जाते. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलावाची दुर्दशा झाली आहे. प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याकडे रहिवासी विवेक पावणसकर यांनी लक्ष वेधले आहे. २००९ पासून त्यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेप्रकरणी ते पाठपुरावा करत आहेत. परंतु, इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही समस्या आजही जैसे थे आहे, असे पावणसकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)