शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ शाडूच्या मूर्तींची विक्री करणारे गणेश कला केंद्र

By admin | Updated: August 30, 2016 02:35 IST

शाडूच्या गणेशमूर्तींची किंमत जास्त असतानाही केवळ त्यांची निर्मिती करून विक्री करण्याचे काम बदलापुरातील एक मूर्तिकार करत आहे.

बदलापूर : शाडूच्या गणेशमूर्तींची किंमत जास्त असतानाही केवळ त्यांची निर्मिती करून विक्री करण्याचे काम बदलापुरातील एक मूर्तिकार करत आहे. पर्यावरणसंवर्धनाचा विचार करूनच त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. पाच वर्षांपासून ते केवळ शाडूच्याच मूर्तींचा व्यवसाय करत आहेत.बदलापूर पूर्वेला सरस्वतीनगरातील सावरकर सदनिका येथे फक्त शाडूच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्र ी करत वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न रवींद्र कुंभार करत आहेत. अनेक भाविक पर्यावरणाबाबत संवेदनशील होत असल्याने प्लास्टर आॅफ पॅॅरिसच्या मूर्तींऐवजी आता शाडूच्या मूर्तींचीदेखील मागणी वाढत आहे. शाडूच्या मातीचा वाढता दर आणि मूर्ती घडवण्यासाठी येणारा खर्च या सर्व बाबी लक्षात घेता शाडूच्या मूर्ती या महाग असतात. शेतातील माती, शाडूची माती आणि सुकलेल्या पालापाचोळ्याच्या मिश्रणातून कुंभार मातीच्या मूर्तींची निर्मिती करतात. शाडूच्या मूर्ती सामान्यपणे जड असतात. यासाठीच शाडूच्या मातीसोबत सुकलेला पाला आणि शेतातल्या मातीचे मिश्रण टाकून ते वजनास हलके करण्याचा प्रयत्न कुंभार यांनी केला आहे. सात ते आठ वर्षांपासून त्यांनी प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्याचे काम थांबवले आहे. या शाडूच्या आग्रहामुळे आम्हाला मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागते. मात्र, आम्ही तयार केलेली एक ते दीड फुटी मूर्ती फक्त अर्ध्या तासात विरघळते. त्यामुळे नदीत विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी होणारी विटंबना या मूर्तींच्या वाट्याला येत नाही, असे कुंभार यांनी सांगितले.