शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ई-फेरफारचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 20, 2017 02:00 IST

राज्य सरकारच्या धोरणानुसार ई-फेरफार पद्धतीने शेतकरी, जमीन खरेदीविक्र ी करणारे तसेच विकासकांना सातबारा व फेरफार उतारे,

वज्रेश्वरी : राज्य सरकारच्या धोरणानुसार ई-फेरफार पद्धतीने शेतकरी, जमीन खरेदीविक्र ी करणारे तसेच विकासकांना सातबारा व फेरफार उतारे, जमिनीची कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी भिवंडीत महसूल विभागांतर्गत एनआयसी सॉफ्टवेअर कंपनीला ई-फेरफार तसेच सातबारा खाते उतारा आदींचे रेकॉर्ड संगणक प्रणालीमध्ये आणण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, प्रणालीत सदोषपणा येत असल्याने ई-फेरफारचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या एनआयसी सॉफ्टवेअर कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय कालन यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्रकुमार कल्याणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन वर्षांपासून या कंपनीने महसूल खात्याला फसवण्याचे काम केले असून सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची अद्ययावत सेवा पुरवण्याचे काम केलेले नाही. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वारस फेरफार, खरेदीविक्र ी फेरफार, ई-फेरफारप्रमाणे करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, हे धोरण भिवंडी महसूल खात्यात कुचकामी ठरले आहे. साइट ओपन होत नसल्याने सातबारानुसार खरेदीखतही होत नाही. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी बुडत आहेत. या घटनेस एनआयसी सॉफ्टवेअर कंपनी जबाबदार असून कंपनीचा सरकारबरोबर अद्ययावत व जलद सेवा पुरवण्याचा करार झालेला असला तरी शेतकरी, जमीन खरेदीदार, विकासक, महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांना रात्रभर त्या सॉफ्टवेअर लाइनवर जागता पहारा ठेवून काम करावे लागत आहे. वेबसाइट ओपन होत नसल्याने कंपनीने जलद कामकाज करण्याच्या बहाण्याने तीन दिवस वेबसाइटचे काम बंद ठेवले आहे. मात्र, या सॉफ्टवेअर कंपनीला जलद सेवा पुरवण्यात अपयश आले असून ई-फेरफार पद्धतीमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. (वार्ताहर)