शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी झुंज संपल्यानंतर दफनविधीसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

कल्याण : कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोविड टेस्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आली. कोरोनामुळे त्याच्या जगण्याची लढाई संपली होती. ...

कल्याण : कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोविड टेस्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आली. कोरोनामुळे त्याच्या जगण्याची लढाई संपली होती. मात्र, त्याच्या दफनविधीसाठी त्याच्या कुटुंबीयांना वणवण करावी लागली. अखेर, शहाड येथील एका दफनभूमीने त्याच्या मृतदेहावर दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. त्याच्या मृत्यूचे दु:ख अनावर झालेल्या त्याच्या पत्नी व मुलाला या घटनेमुळे अश्रू अधिकच अनावर झाले होते.

वालधुनी परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीला किडनीचा आजार होता. त्याला रात्री खूप त्रास सुरू झाला. त्याच्या पत्नीने त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी त्याला दाखल करून घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची ॲण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पत्नीने त्यांचे शेजारी नासीर शेख यांना मदतीस बोलाविले. मृतदेह घेऊन रुग्णवाहिकाचालक स्मशानभूमीत गेला. मात्र, त्यांच्या नंतर लक्षात आले की, मृत व्यक्ती ही मुस्लिम धर्मीय आहे. तिच्यावर अग्निसंस्कार होऊ शकत नाहीत. त्यासाठी दफनभूमीत नेले पाहिजे. त्याने गोंधळलेल्या परिस्थितीत मृतदेह पुन्हा रुक्मिणीबाई रुग्णालयात आणला. त्याचा दफनविधी न झाल्याने सकाळी त्याचे शेजारी नासीर शेख व अन्य लोक पोहाेचले. मृतदेह घेऊन शेजारी तीन ते चार कबरस्तान फिरले. त्यावेळी कबरस्तानात काम करणाऱ्यांनी अन्य ठिकाणी न्या, असे सांगितले. शेजारी त्याचा मृतदेह दफनविधीसाठी घेऊन फिरत होते. दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने मृतदेह पुन्हा रुक्मिणीबाई रुग्णालयात आणला. अखेरीस शहाड येथील कबरस्तानने दफनविधी करण्यास तयारी दर्शविली. तेव्हा कुठे शेजारी आणि मृताच्या पत्नी, मुलाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, त्यांची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती. मरणानंतरही त्याच्या कुटुंबीयांना या यातना सहन कराव्या लागल्या. सामान्य माणसाला जीवन जगत असताना अनेक ठिकाणी कठीण परिस्थितीचा सामना करीत वणवण करावी लागते. मृत्यूनंतरही त्याची वणवण संपत नाही. हे एक विदारक चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

साेयीसुविधांअभावी रुग्णांचे हाल

कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता आहे. दोन शवदाहिन्या बंद आहेत. जगण्यासाठी आरोग्याच्या सोयीसुविधा अपुऱ्या पडत असताना दफनविधीसाठी त्रास सहन करावा लागत आहे.

फोटो-कल्याण-मृतदेह

-----------------