शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चौघांचा चाकूने खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

ठाणे : पूर्ववैमनस्यातून महेंद्र दुनघव (वय २१, रा. माजीवडा, ठाणे) या तरुणावर दिनेश अहिरे, बाळकृष्ण साटम, दीपक अहिरे आणि ...

ठाणे : पूर्ववैमनस्यातून महेंद्र दुनघव (वय २१, रा. माजीवडा, ठाणे) या तरुणावर दिनेश अहिरे, बाळकृष्ण साटम, दीपक अहिरे आणि अक्षय दोंडके या चौघांनी चाकूने खुनीहल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल झाला.

माजीवडा, साईनाथनगर भागात राहणाऱ्या दिनेश याच्यासह चौघांनी आपसात संगनमत करून महेंद्र याला कोणतेही कारण नसताना जुन्या गोष्टीचा राग मनात धरून ५ जुलै २०२१ रोजी रात्री ११.४० वाजण्याच्यासुमारास वाद घातला. यातूनच त्याला शिवीगाळ करून मारहाणही केली. नंतर दीपक, अक्षय आणि बाळकृष्ण यांनी त्याचे हातपाय पकडले, तर दिनेश याने त्याच्याकडील चाकूने महेंद्रच्या छातीच्या डाव्या भागावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी सुरुवातीला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यानंतर चौघेही पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.