शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

डोंगराच्या तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुल्डोझर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:22 IST

Thane : वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

ठाणे : घोलाई नगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाई नगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वर नगर, भास्करनगर, पौंडपाडा, कारगिल खोंडा आदींसह इतर भागातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असलेल्या तब्बल १२०० अतिक्रमणांवर आता वनविभाग बुल्डोजर फिरविणार असल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. या घटनेनंतर वनविभागावर टिका झाल्यानंतर त्यांनी मागील काही दिवसापासून डोगंरावरील तीव्र उतारांच्या अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु केला होता. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाई नगर, पौंडपाडा, वाघोबा नगर आणि कारगिल खोंड या भागात हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार आता जो अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार आता याठिकाणाच्या अतिक्रमणाना घरपट्टी केव्हा लावली गेली, पाणी केव्हा दिले गेले, वीज केव्हा दिली गेली याची माहिती आता वनविभागाकडून गोळा केली जात आहे. त्यातील किती अतिक्रमणो जुनी आणि नवीन आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने महापालिका आणि महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून आता या डोंगरावरील तीव्र उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई करतांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार येथील बांधकामधारकांकडून देखील सोमवार पासून माहिती मागविली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधणारवनविभागाच्या माध्यमातून तीव्र उतारावील १२०० बांधकामे येत्या ऑगस्ट महिन्यात हटविणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी किंबहुना अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी या भागात ८ कोटींचा निधी खर्च करुन संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसापासून आमच्या विभागाकडून डोंगराच्या तीव्र उतारावरील अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु होता. त्यानंतर त्याचा अहवाल तयार झाला असून याठिकाणची १२०० अतिक्रमण आता हटविली जाणार आहे. त्यानंतर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.(नरेंद्र मुठे - वनक्षेत्र अधिकारी, ठाणे)

टॅग्स :thaneठाणे