शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या कार्यालयात जबरदस्तीने कब्जा

By admin | Updated: May 8, 2017 06:01 IST

एका इमारतीच्या बांधकामातील भागीदारीच्या करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवल्याचा राग मनात धरून जागृती

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : एका इमारतीच्या बांधकामातील भागीदारीच्या करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवल्याचा राग मनात धरून जागृती डेव्हलपर्सच्या सुमारे १० ते १२ जणांनी अरुणभूमी कॉर्पोरेशनच्या कार्यालयात जबरदस्तीने कब्जा केला. तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीरागावमधील एका जागेवर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या जागेचा सातबारा अरुणभूमी कॉर्पोरेशनच्या नावे असून त्यावरील बांधकामासाठी जागृती डेव्हलपर्सची उपबिल्डर म्हणून नियुक्ती केली आहे. जागृती डेव्हलपर्सचे किशोर शाह, रामआशीष गुप्ता, मदन गुप्ता, दुल्लाभाई बलदानिया हे भागीदार आहेत. यातील रामआशीष गुप्ता हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. तर, अरुणभूमी कॉर्पोरेशनचे मालक एन.के. जोशी हे आहेत. या दोन्ही बिल्डरांमध्ये त्या बांधकामांसाठी २००९ मध्ये भागीदारीचा करार होऊन तो २०११ मध्ये नोंदणीकृत केला. दरम्यान, जागृती डेव्हलपर्सने जागेवरील बांधकामाला २०१० मध्ये सुरुवात केली. तसेच करारातील अटीशर्तींनुसार बांधकामाच्या ठिकाणचे कार्यालय दोन्ही बिल्डरांकडून वापरले जात होते. जागृती डेव्हलपर्सने २०१५ पासून बांधकाम बंद केले. तसेच कार्यालयात येणेही बंद केले. करारातील अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी अरुणभूमी कॉर्पोरेशनने करार रद्द केल्याची नोटीस जागृती डेव्हलपर्सला पाठवली. त्याला जागृती डेव्हलपर्सने उत्तर न दिल्याने अरुणभूमीमार्फत बांधकाम सुरू करण्यात आले. नोटीस पाठवूनही बांधकाम परस्पर सुरू केल्याचा राग मनात धरून जागृती डेव्हलपर्सच्या काही जणांनी अरुणभूमीच्या कार्यालयात जबरदस्ती कब्जा करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करून सीसीटीव्हीची तोडफोड केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.