शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न, औषध प्रशासन विभागाकडून वर्षभरात १९९ प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 23, 2017 01:40 IST

मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्या निकाली काढताना, सरकारी तिजोरीत ४५ लाख ६५ हजार रुपये रक्कम दंड म्हणून जमा झाली आहे. त्यातच २६४ तक्रारी न्यायालयात दाखल असून त्यावर तारीख- पे-तारीख पडत असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली.अस्वच्छतेचे वातावरण, कमी प्रतीचा माल अशा आलेल्या २५७ आणि मागील प्रलंबित ४९६ अशा ७५३ तक्रारींपैकी १९९ तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी मार्गी लावले आहेत. ते मार्गी लावताना दंड आकारला जात आहे. अशा प्रकारे निकाली काढलेल्या तक्रारीपोटी ४५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षातील तक्रारी असून त्यामध्ये आॅगस्ट २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी निकाली काढताना ८ लाख ७० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. मे आणि डिसेंबर २०१६ हे दोन महिने सोडले, तर इतर महिन्यात लाखोंची दंडात्मक कारवाई केली. तर, ५५४ प्रकरणे प्रलंबित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याचदरम्यान, त्या वर्षात एफडीएने कोकण विभागात ४ हजार ७७९ ठिकाणी तपासणी करून १ हजार १११ ठिकाणी सुधारणा करता येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सुधारणा नोटिसा दिल्या होत्या. त्यातील १४० दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, तपासणीत ५०१ प्रकरणांत १४ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्याचे सूत्रांनी सांगितले.