शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो पार्कच्या उभारणीत अतिक्र मण अन प्रदूषणाचे अडथळे

By admin | Updated: August 10, 2015 23:12 IST

ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत.

ठाणे : ठाण्यात असणारी खाडी ही शहराची ओळख असली तरी बेकायदा बांधकामे, कचरा, सांडपाणी यामुळे ती गटार बनली आहे. यामुळे खाडीतील मासे तसेच इतर जीवजंतू नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टिकणे कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या परिसराला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य जाहीर करावे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.ठाणे खाडीत पूर्वी रेवू, कटला आदी प्रकारचे मासे मिळत होते. मात्र, प्रदूषणामुळे माशांची पैदास क मी झाल्याने खाडीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या फलेमिंगोंचीही उपासमार होत आहे. राज्य शासनाच्या वन विभागात खारफुटी विभागाची स्थापना २०१२ मध्ये झाली. खारफुटी क्षेत्रामधील जवळपास १ हजार झोपड्यांचे अतिक्रमण हटविले असून मुंब्रा रेतीबंदर, मानखुर्दपासून वाशी रेतीबंदरपर्यंत असलेल्या खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात येणार असून नियंत्रित पर्यटनाला परवानगी दिली जाणार आहे. मात्र, शहरीकरण व कारखानदारी वाढल्याने ठाणे खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे खाडीच्या प्रवाहात विविध ठिकाणच्या पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार अनधिकृत वस्तींमधून टाकण्यात येणारा कचरा तसेच खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे त्याच्या खांबांजवळ बांधकामांचा कचरा टाकला जातो. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच खाडी परिसरात वाढणाऱ्या झोपडीधारकांना राजकीय वरदहस्त असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. हा भाग महसूल खात्याच्या हद्दीत येत असल्याने वन खात्याला येथील अतिक्रमणे हटविणे शक्य होणार नाही.