शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्या विक्रेत्याला पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

ठाणे : किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मदन प्रजापती (२४, रा.नेरुळ, नवी मुंबई) याला ठाणे ...

ठाणे : किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मदन प्रजापती (२४, रा.नेरुळ, नवी मुंबई) याला ठाणे जिल्हा (विशेष पोस्को) न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास त्याला तीन महिने सश्रम कारावासाची अतिरिक्त शिक्षाही सुनावली आहे.

पीडित १२ वर्षीय मुलगी ६ जुलै, २०१५ रोजी सायंकाळच्या वेळी प्रजापती याच्या किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेली होती, तेव्हा आरोपीने मुलीला वही दाखविण्याच्या बहाण्याने दुकानात बोलविले. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करून, पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर सुनावणीसाठी आल्यानंतर, सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे आणि सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य मानली. त्या आधारे आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मंगेश पालांडे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार प्रभाकर महाजन यांनी काम पाहिले.