शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्स्ट कम, फर्स्ट बेसिस’ची घोषणा पोकळ

By admin | Updated: February 4, 2017 03:35 IST

ग्रंथदालनातील स्टॉल्सला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकांकडून एक पुस्तक भेट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे ३५० प्रकाशकांकडून

पु.भा. भावे साहित्यनगरी : ग्रंथदालनातील स्टॉल्सला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकांकडून एक पुस्तक भेट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे ३५० प्रकाशकांकडून ३५० वाचकांना एक पुस्तक भेट मिळणार होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून हा पायंडा पडणार होता. परंतु, त्याबाबत प्रकाशक आणि विक्रेत्यांना काहीच माहीत नव्हते. त्यामुळे पहिल्या वाचकाला पुस्तकच मिळाले नसल्याने ही घोषणा पोकळ ठरली आहे. साहित्य संमेलनातील ग्रंथदालन, महामंडळ आणि आयोजक यांच्यात समन्वय साधला जावा, यासाठी प्रथमच प्रकाशक समितीची स्थापना केली होती. या समितीत महामंडळाचे तीन पदाधिकारी आणि आयोजन समितीचे तीन सदस्य आहेत. असे असतानाही प्रकाशक आणि विके्रत्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचली नसल्याचे उघड झाले.डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात ग्रंथदालनाची सोडत पार पडली. त्या वेळी मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी ग्रंथदालनात प्रत्येक स्टॉलला प्रथम भेट देणाऱ्या वाचकाला प्रकाशकाकडून एक पुस्तक भेट मिळणार असल्याचे सांगितले होते. यंदाच्या साहित्य संमेलनापासून त्याचा पायंडा पडणार होता. परंतु, प्रत्यक्षात विक्रेते आणि प्रकाशक यांना याविषयी कोणतीच माहिती नव्हती. या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार होते. पण, त्यांच्या गैरहजेरीमुळे संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पाडला. (प्रतिनिधी) पहिल्या वाचकाला पुस्तक भेट देण्याच्या योजनेविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती. या उपक्रमाची माहिती असती, तर आम्ही नक्कीच याला प्रोत्साहन दिले असते. मराठी भाषा वाढावी आणि मराठी माणसांपर्यंत ती जास्तीतजास्त पोहोचावी, हाच आमचा उद्देश आहे. आताही त्यांनी या योजनेविषयी सांगितल्यास आम्ही एका वाचकाला पुस्तक भेट देऊ. - सुरेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली