शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या पहिल्या दिवशी ‘तो’ रुग्णालयात

By admin | Updated: June 28, 2017 03:18 IST

मध्यप्रदेशातून विश्वनाथ यादव (३६) हा तरुण नोकरीनिमित्ताने मुंबईत आला होता. याचदरम्यान, नोकरीच्या पहिल्या दिवशी हजेरी लावण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मध्यप्रदेशातून विश्वनाथ यादव (३६) हा तरुण नोकरीनिमित्ताने मुंबईत आला होता. याचदरम्यान, नोकरीच्या पहिल्या दिवशी हजेरी लावण्यासाठी आल्यावर तो ठाणे रेल्वे स्थानकात पडला. या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला अनोळखी म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तो काही दिवस आॅक्सिजनवर होता. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. यात त्याच्यावर वेळीच योग्य उपचार झाल्याने स्वगृही रवाना झाला आहे. सोमवारी १२ जून रोजी विश्वनाथला बेवारस रुग्ण म्हणून काही लोकांनी आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या वाचण्याची जणू शक्यताही डॉक्टरांनी सोडली होती. त्यातच ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी केम्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेखा गजलवार, डॉ.सचिन शिंदे हे त्याच्यावर उपचार करीत होते. सुरुवातीचे काही दिवस तो आॅक्सिजनवर होता. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊन तो शुद्धीवर आल्याची माहिती परिचारिका शिला कचरे आणि कल्पना महाजन यांनी डॉक्टरांना दिली. विश्वनाथ बोलू लागल्यावर रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय पारखे, श्रीरंग सिद् यांनी त्याची विचारपूस केली. त्याची ओळख पटल्यावर तो भाऊ नागेंद्रप्रसाद यादव यांच्यासोबत मध्यप्रदेशात घरी जाण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पारखे व सिद यांनी दिली.