शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गतिरोधकावर काळे-पांढरे पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

------ रिक्षाची दुचाकीला धडक कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणारे महेश बेले हे संकेत भंडारेसह दुचाकीने बुधवारी संध्याकाळी ७ च्या ...

------

रिक्षाची दुचाकीला धडक

कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणारे महेश बेले हे संकेत भंडारेसह दुचाकीने बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मुरबाड रोडने उल्हासनगर येथे जात होते. त्यावेळी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरील रोडवर समोरून येणाऱ्या भरधाव रिक्षाची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील महेश आणि संकेत हे दोघेही जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी महेश यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालक उत्तरेश्वर जगताप याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

---

दुचाकी चोरीला

कल्याण : रहिम शेख यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेकडील मौलवी कम्पाउंड परिसरातील मुन्ना मौलवी बिल्डिंगच्या समोर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी रहिम यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----

व्हॅनची चोरी

कल्याण : पूर्वेकडील तिसगाव रोड परिसरात राहणारे राजेंद्र आसवले यांनी त्यांच्या ताब्यातील व्हॅन ते राहत असलेल्या शिवनेरी कॉलनीसमोर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना २० मेच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आसवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

----

क्षुल्लक कारणावरून मारहाण

डोंबिवली : दुचाकी खाली का पाडली या कारणावरून रामा ऊर्फ रामदास समाधान धवसे, विजय कसबे, अमोल आंभोरे ऊर्फ पुंगळ्या या तिघांनी मंगेश मारुती कांबळे यांना लोखंडी पाइप आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ९ च्या सुमारास त्रिमूर्तीनगरमध्ये घडली. याप्रकरणी मंगेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

----

खर्च मागितला म्हणून मारहाण

कल्याण : पश्चिमेकडील आंबिवलीत राहणारे शब्बीर शेख यांनी त्यांच्या दुकानाचा गाळा मुस्ताद सय्यद याला भाड्याने दिला आहे. त्या गाळ्याचे नवीन ॲग्रिमेन्ट करण्यासाठी एक हजार रुपये लागणार होते. त्यातील ५०० रुपयाचा खर्च मागितल्याच्या रागातून मुस्तादने शब्बीर यांना बेदम मारहाण केली. यात शब्बीर यांच्या हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजता मोहने लहुजीनगर येथे घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मुस्तादविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

----

मोबाइल लंपास

डोंबिवली : दरवाजावाटे घरात शिरून चोरी करण्याचे प्रकार वाढले असून, कल्याणपाठोपाठ आता डोंबिवलीतील पश्चिम भागातील घनश्याम गुप्ते रोडवर बुधवारी सकाळी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. येथील मारुती स्मृती बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रियंका धुरी यांच्या घरातील १५ हजाराचा मोबाइल चोरट्याने दरवाजावाटे आतमध्ये शिरून लंपास केला आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

--------------