शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: August 29, 2016 04:56 IST

महापालिकेतील नगररचनाकार संजीव करपे आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा थांगपत्ता अद्याप लागत नसल्याने नातेवाइकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झाला

उल्हासनगर : महापालिकेतील नगररचनाकार संजीव करपे आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा थांगपत्ता अद्याप लागत नसल्याने नातेवाइकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलीस आणि करपे कुटुंबीय याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.करपे पुणे येथे शहर विकास आराखड्याच्या बैठकीसाठी निघाले होते. मात्र, लोणावळा येथील बोरघाटात गाडी थांबवून गाडीचालक तिवारीला गाडी घरी घेऊन जाण्यास सांगितले. तसेच मागून मला गाडी घेण्यास येत असल्याचे सांगितले. तेव्हापासून करपे बेपत्ता झाले आहेत. खोपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यांचे मोबाइल रेकॉर्डिंग तपासणे पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेऊन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे.२० आॅगस्टला बेपत्ता झालेले करपे यांचा आठ दिवसांत थांगपत्ता लागलेला नाही. तसेच कुटुंबाने केलेल्या तपासणीत काहीच हाती लागले नसल्याने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. ज्या वाढीव बांधकाम परवान्यांबाबत आमदार ज्योती कलानी यांनी आक्षेप घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्या ३९ बांधकाम परवान्यांना नुकत्याच झालेल्या महासभेने स्थगिती दिली आहे. चुकीच्या बांधकाम परवान्यांप्रकरणी राजकीय नेत्यांसह बिल्डर, दलाल आणि पालिका अधिकारी यांनी दबाव टाकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)