शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसाला महिलेची मारहाण

By admin | Updated: September 29, 2016 03:49 IST

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने महिला पोलिसाला

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने महिला पोलिसाला मारहाण तसेच शिवीगाळ करत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.हीना अन्सारी (रा. रहेजा कॉम्प्लेक्स, पत्रीपूल) असे या महिलेचे नाव आहे. ती वडील अताउल्लाह अन्सारी यांच्यासमवेत राहते. रहेजा कॉम्प्लेक्समधील त्यांच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यासाठी अताउल्लाह यांनी स्थानिक इस्टेट एजंट किरण दंडगव्हाळ यांच्यामार्फत मोहम्मद मुजावर यांच्याशी १० हजार रु पये टोकन घेत प्राथमिक व्यवहार केला होता. मात्र, हीनाने या व्यवहाराला विरोध करण्याबरोबरच मुजावर यांना वारंवार फोन करून घराचे कागद मागण्यास सुरु वात केली. हीनाच्या त्रासाला कंटाळून अखेर मुजावर यांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दंडगव्हाळ आणि मुजावर हे अताउल्लाह अन्सारी यांच्या घरी गेले असता हीनाने मुजावर यांना मारहाण तसेच आपल्यालाही शिवीगाळ केल्याचे दंडगव्हाळ यांनी सांगितले. याप्रकरणी एमएफसीचे व.पो.नि. अनिल पोवार यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.महिला पोलीस हवालदार सुमन वांगड यांनी हीनाला नेले असता तेथे हीनाने वांगड यांना मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात जोरात आरडाओरडा करून शिवीगाळही केली. ‘माझी ओळख वरपर्यंत आहे, तुम्ही सर्वांनी बघा मी आता काय करते ते,’ अशी धमकीही तिने पोलिसांना दिली आहे.