शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

फातिमा रस्ता : रिक्षा जाईल इतकाच रस्ता खुला, नागरिक हतबल

By admin | Updated: March 31, 2017 06:13 IST

शिवसेनेच्या नगरसेवकाने नागरिकांना वेठीस धरून फातिमा रस्ता बंद ठेवला आहे. हा रस्ता सुरू करण्याचे आदेश

अंबरनाथ : शिवसेनेच्या नगरसेवकाने नागरिकांना वेठीस धरून फातिमा रस्ता बंद ठेवला आहे. हा रस्ता सुरू करण्याचे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी देऊनही हा रस्ता पालिकेने पूर्ण खुला केलेला नाही. टीकेची झोड उठताच पालिका अधिकाऱ्यांनी केवळ एक रिक्षा जाईल इतकाच रस्ता खुला केला आहे. निगरगट्ट पालिका प्रशासनापुढे अंबरनाथचे नागरिक हतबल झाले आहेत.शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेला फातिमा रस्ता चार महिन्यांपासून बंद ठेवला आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी हा रस्ता बंद केल्याने नागरिकांनीही कळ सोसली. मात्र, १० दिवसांपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण झालेले असतानाही खुला करण्यात आला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी शिवसेना नगरसेवकाने हा रस्ता मुद्दाम बंद करून ठेवला आहे. रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच खासदार शिंदे यांनी हा रस्ता तत्काळ खुला करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, आदेश आल्यावर नगरसेवकाच्या सांगण्यावरून या ठिकाणी नव्या रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे खोटे कारण पुढे करून हा रस्ता खोदण्यात आला. मुळात जलवहिनी जीवन प्राधिकरणाने या ठिकाणी टाकलेलीच नाही. या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. असे असताना केवळ नागरिकांची अडवणूक करण्यासाठी हा रस्ता बंद केला. पालिका अधिकाऱ्यांना रस्ता खुला करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अधिकाऱ्यांनी ४० फूट रस्त्यापैकी केवळ चार फुटांचा रस्ता नागरिकांसाठी खुला केला. उर्वरित रस्त्यावर खडी टाकून तो तसाच बंद ठेवला आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेची प्रतिमा मलिनपालिका प्रशासन आणि नगरसेवकाच्या या निगरगट्टपणापुढे नागरिक हतबल झाले आहेत. केवळ श्रेय घेण्यासाठी नागरिकांची केलेली कोंडी ही शिवसेनेची प्रतिमा मलिन करणारी ठरत आहे.