शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स

By admin | Updated: August 18, 2016 05:13 IST

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापुढे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने नांगी टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा दावा नेहमीच महापालिकेतर्फे

कल्याण : फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापुढे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने नांगी टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा दावा नेहमीच महापालिकेतर्फे केला जात असला तरी हा कारवाईचा ‘दिखावा’ सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासमोरच उघड झाला आहे. शनिवारच्या महासभेत हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारवाईचा दिखावा चांगलाच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक असो अथवा रेल्वेस्थानक लगतचा परिसर तेथे फेरीवाल्यांनी सर्रात्र अतिक्रमण केले आहे. हीच परिस्थती डोंबिवली रेल्वेस्थानक परिसराची आहे. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांकडून केले जात असलेले कारवाईचे दावे पुरते फोल ठरले आहेत. ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून हफ्तेखोरीमुळे या फेरीवाल्यांना अभय कसे मिळते, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. याची गांभिर्याने दखल घेत आयुक्त ई. रवींद्रन यांनी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, या उपरही फेरीवाला कारवाईचा फार्स सुरूच आहे. याचा प्रत्यय शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राणे यांना मंगळवारी आला. राणे सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आले असता मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्ते अडवून बसल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन आणि कर्मचारीही उपस्थित होते. राणे यांनी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता कारवाई सुरू असल्याचे थातूरमाथूर उत्तर त्यांना संबंधितांनी दिले. परंतु, कोणतीही कारवाई होत नसल्याचे तसेच फेरीवाले बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय करत असल्याचे राणे यांना दिसले. त्यांनी याप्रकरणी पथकप्रमुख रवींद्र गायकवाड यांच्याबाबत विचारणा केली असता ते देखील घटनास्थळी हजर नव्हते. (प्रतिनिधी)राणे यांनी या ‘दिखावा’ कारवाईची चित्रफित काढली आहे. ती शनिवारच्या महासभेत सादर केली जाणार आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच आयुक्तांना याप्रकरणी जाब विचारला जाणार आहे. महापौर यांनीही या दिखाऊगिरीची गंभीर दखल घ्यावी, असे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.