शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: March 31, 2017 05:50 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गासाठी लागणाऱ्या जमीनमोजणीसाठी आलेल्या तहसीलदारांसह

खर्डी : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गासाठी लागणाऱ्या जमीनमोजणीसाठी आलेल्या तहसीलदारांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील गोलभण गामस्थांनी प्रचंड विरोध केला. या वेळी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.गुरु वारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोलभण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना जमीनमोजणीच्या नोटिसा दिल्या. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यातच जमीनमोजणीस संभाव्य बाधा निर्माण करतील, या हेतूने शहापूर तहसीलदारांनी दळखण, जरंडी, गोलभण येथील संघर्ष समितीच्या सदस्यांना चॅप्टर केसेससंदर्भात जबाब देण्यासाठी शहापूर कार्यालयात हजर राहावे, असे आदेश दिले. ते तिकडे जाताच इकडे परस्पर जमीन मोजण्यासाठी तहसीलदार स्वत: आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मोजणीसाठी आलेल्या सरकारी ताफ्याला रस्त्यातच अडवून त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. या वेळी वृद्ध महिलांची संख्या अधिक होती. तहसीलदारांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, जमलेल्या महिला आणि शेतकरी कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे तेथील वातावरण चांगलेच तापलेले होते. (वार्ताहर)