शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे, आता स्वत:च्या पिकांसह बांधावरील झाडांची माहिती ‘ई पीक ॲप’मध्ये भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्या शेतात लागवड, पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाची पीकनिहाय, हंगामनिहाय व ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : आपल्या शेतात लागवड, पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाची पीकनिहाय, हंगामनिहाय व क्षेत्रनिहाय माहिती स्वतः भरणे, पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस व विहीर, इमारत याचीदेखील नोंद आता ईपीक ॲपमध्ये स्वत:च करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव‌‌ ठाकरे ''ई-पीक'' मोबाईल ॲप''चे आज, शुक्रवारी लोकार्पण करणार आहेत.

यासाठी आता तलाठी व कृषी सहायक यांनी गावपातळीवर कोतवाल, पोलीस पाटील, कृषी मित्र, मोबाईल दूत, धान्य दुकानदार, सेतूचालक, सामाजिक कामात हिरीरीने भाग घेणारे गावांतील प्रमुख व शेतकरी यांच्या मदतीने या ई-ॲपचा प्रचार, प्रसिद्धी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपवर अपलोड केलेल्या पिकांच्या नोदींना तलाठी ई-पीक प्रणालीद्वारे मंजुरी देणार आहे. या ई-पीक पाहणीचे डेमो ॲप व प्रत्यक्ष ॲप वापरासाठी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गाव स्तरावर तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा लागेल. शेतकऱ्यांनी १०० टक्के आपल्या सर्व्हे नंबरनिहाय पिकांच्या नोंदी घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश ज. नार्वेकर यांनी केले आहे.

पिकांची अद्ययावत व खरीखुरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकांचे ''जीओ टॅगेड'' छायाचित्र काढायचे आहे. ते अक्षांश रेखांश, दिनांक व वेळ दर्शवील. शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या त्यांच्या शेतातील पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी जमाबंदी आयुक्तांमार्फत तलाठ्यांसाठी मिडलवेअर ई-पीक आज्ञावली विकसित केली आहे. या ॲपमध्ये जमिनीचा तपशील जसे की, सर्व्हे क्रमांक, खाते क्रमांक, एकूण क्षेत्र, धारण प्रकार, संयुक्त, वैयक्तिकचा समावेश आहे. पिकांची माहिती ऑफलाईन मोडमध्येही भरण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.