शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला अतिरिक्त पाणी

By admin | Updated: October 14, 2016 06:35 IST

भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला

ठाणे : भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात भातसा धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्याचा प्रस्ताव येत्या २० आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. बारवीच्या पाण्यासंदर्भातील महत्त्वाचा करार एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाशी लवकरच करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. बारवी धरणाची उंची वाढल्याने त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या महापालिकांना या धरणातून पाणीपुरवठा होणार आहे, त्यात्या महापालिकांनी या धरणाच्या कामात विस्थापित नागरिकांना आपापल्या प्राधिकरणात नोकरी देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेनेदेखील यातील काहींना नोकरीत सामावून घेण्याचे निश्चित केले आहे. ठाण्याला धरणातून पाणीपुरवठा होणार असून त्यानुसार पालिका या धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी महापालिका येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आधी ठरवलेल्या कोट्यानुसार धरणाची उंची वाढवल्यानंतर शिल्लक असलेले १०० दशलक्ष लीटर पाणी देण्यात येईल, हे ठरले होते. त्यानुसार, आता येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्यासाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावूनदेखील घेतले जाणार आहे. दरम्यान, भातसामधूनदेखील ठाणे महापालिका आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी ठाणे महापालिका भातसामधून २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार असल्याने महापालिकेला येथून एकूण ३०० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. ठामपाला सध्या शहरासाठी ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून वाढीव पाण्यामुळे ठाण्याला भविष्यात ६८० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यांना लागणारे पाणी याचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे.