शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचा अनुभव

By admin | Updated: May 29, 2017 06:09 IST

एखाद्या शहराच्या विकासासाठी केवळ सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची नसते. शहराचा खरा विकास साधायचा असेल, तर शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ: एखाद्या शहराच्या विकासासाठी केवळ सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची नसते. शहराचा खरा विकास साधायचा असेल, तर शहरातील सर्वच पक्षांनी एकत्रित येण्याची गरज असते. सर्व पक्ष विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्यावर शहराचा विकास कसा साधला जातो, याचे उदाहरण अंबरनाथमध्ये दिसत आहे. सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका आणि प्रशासनाची चोख जबाबदारी यामुळेच अंबरनाथचा विकास साधला जात असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंबरनाथमधील पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरच्या सभेत त्यांनी पालिकेतील बदलत्या वातावरणाचे भरभरुन कौतुक केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघे सकारात्मक भूमिकेतून पुढे सरकल्यावर खऱ्या अर्थाने रखडलेली कामे मार्गी लागतात. आज अंबरनाथमध्येही मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. प्रशासकीय इमारतीसोबतच नाट्यगृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील रस्त्यांची स्थितीही सुधारण्यास मदत होत आहे. अनेक कामे होत असली, तरी त्या कामाचा दर्जाही राखला गेला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीही महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. प्रशासकीय इमारत तयार होत असतांना त्याचा दर्जा चांगला राखण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच शिवमंदिराच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केवळ शिवमंदिर महोत्सवापूर्ती मंदिर देखणे करण्यात अर्थ नाही. ते मंदिर आणि त्याचा परिसर कायमस्वरुपी देखण झाले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनीही या मंदिराच्या कामासाठी एक कोटींचा निधी देण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, वामन म्हात्रे आणि सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.