शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांहून जास्त पुस्तकांची देवाणघेवाण

By admin | Updated: May 9, 2017 01:05 IST

‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमात ठाण्यात तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमात ठाण्यात तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमाला पाचशेहून अधिक वाचकांनी भेट दिली. विशेष म्हणजे व्हीलचेअरवर येऊन पुस्तकांचा आस्वाद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही यात समावेश होता. पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाचनाचे प्रमाण अधिक वाढते. त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला. नाशिकला मिळालेल्या यशानंतर ठाण्यातदेखील तो राबवला गेला. ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे!, अखंड वाचत जावे’ या संकल्पनेवर आधारित पुस्तकाच्या देवाणघेवाणीचा आगळावेगळा उपक्रम ठाणेकरांनी अनुभवला. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनचळवळीनंतर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम. शनिवारी ठाण्यातील घंटाळी सहनिवास येथे शुभारंभ झाला. रविवारी वाचकांची दुप्पट गर्दी होती. पुस्तकाच्या देवाणघेवाणीसाठी लांबचलांब रांगा होत्या. या उपक्रमात पहिल्या दिवशी ८०० पुस्तके मांडण्यात आली होती. तसेच, नवीन पुस्तकांचादेखील यात समावेश होता. विशेष म्हणजे ठाण्यातील साहित्यप्रेमी भूषण कुलकर्णी आणि आनंद मराठे यांनी प्रत्येकी २५० सुस्थितीतील दर्जेदार पुस्तके योजनेसाठी भेट दिली. सर्वाधिक पुस्तके या दोघांनीच दिली असल्याचे रानडे यांनी सांगितले. वारंवार असे आयोजन करण्याची त्यांनी मागणी केली. या उपक्रमासाठी नाशिकवरून आलेले समीर देशपांडे, शैलेश नाटकर तसेच ठाण्यातील दीपक मालपुरे यांची विशेष साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पुस्तके, दुर्मीळ पुस्तके, मराठी, इंग्रजी, बालसाहित्य यांचे आदानप्रदान झाले. सर्व प्रकारची पुस्तके यात आली आणि गेलीही, असे रानडे यांनी सांगितले. उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मधुरा बापट आणि रश्मी जोशी यांनी सांभाळली.