शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

१५ आॅगस्टला सर्वत्र ‘साउंड म्यूट डे’, पाला संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:59 IST

डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.

कल्याण : साऊंड आणि लायटिंगसाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ६६ डेसिबलच्या आवाजाच्या मर्यादेत ध्वनिक्षेपणाचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.ही ‘आवाजबंदी’ त्या दिवशी राज्यभरात असेल. या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि ती मर्यादा वाढवून द्यावी, या मागणीसाठी दीड महिन्यात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या ‘साऊंड म्यूट डे’ मुळे १५ आॅगस्टची देशभक्तीपर गीते, त्याचदिवशी साजºया होणाºया दहीहंडीच्या डीजेची धम्माल ऐकायला मिळणार नाही. सारे काही शांततेत-आवाजविरहित पार पडेल, असे सांगत नायडू म्हणाले, ‘पाला’ ही संघटना देशातील २५ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. देशभरातील १० लाख लोकांचा पोटा-पाण्याचा व्यवसाय ‘साऊंड आणि लायटिंग’वर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आवाजावर मर्यादा घालून दिली आहे. त्यात ६६ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा ओलांडणाºया साऊंट व लायटिंग व्यावसायिकांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. ही मर्यादा पाळत साऊंड सिस्टिम चालविणे शक्य नाही. सरकारने तर साऊंडचे परवाने देणे बंद केले आहे. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त साऊंड सिस्टिम चालविणारे व्यावसायिक आहेत. आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांचे मरण ओढवले आहे.आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. तसेच आवाजाची मर्यादाही ओलांडायची नाही. सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे नायडू यांनी सांगितले.गप्पाही मर्यादेबाहेरन्यायालयाने घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवून देताना नायडू म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती परस्परांशी गप्पा मारतात तेव्हा त्याचीच पातळी अनेकदा ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा जेथे ध्वनिक्षेपकांचा वापर होतो अशा कार्यक्रमांत आवाजाची ही पातळी राखणे कठीण आहे.साऊंड सिस्टिम चालविणारा तांत्रिक शिक्षण घेतलेला असतो. पोलीस उद्धट वर्तन करतात. लाठी उगारतात. तसेच प्रसंगी त्यांच्या साऊंड सिस्टिमचे नुकसान करतात. हा आमचा उद्योग आहे. पण पोलीस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. गैरवर्तन करतात. त्याचाही त्रास होतो. याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.