शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 15, 2020 16:57 IST

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले.

ठळक मुद्देसुशांतसोबतची कॉफीशॉप मधील भेट कायम स्मरणात राहील - शिरीष लाटकरसुशांत अतिशय नम्र, अभ्यासू नट होता- लाटकरपवित्र रिशता मधील सुशांत डोळ्यांसमोर आला

ठाणे : सुशांतच्या आत्महत्त्येची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली. तो इतक्या टोकाचे पाऊल उचलणारा अभिनेता नव्हता, तो यशस्वी अभिनेता होता, त्याला मिळालेले यश हे सगळ्या गोष्टींवर मात करायला पुरेसे होते असे भावुक उद्गार ठाण्यातील मराठी- हिंदी मालिकांचे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी काढले..                      पवित्र रिशता या मालिकेचे संवाद लेखन लाटकर यांनी केले होते. या मालिकेच्या सेट वर पहिली भेट सुशांत सोबत मे 2009 मध्ये झाली होती. त्यांनतर मालिकेनिमित्ताने त्याला तीन ते चार वेळा भेटलो होतो. मराठी वातावरणातील ही मालिका होती. मराठी कलाकारांची मांदियाळी या मालिकेत होती. सुशांतच्या संवादात दोन ते तीन मराठी शब्द असत ते मी त्याला समजावून सांगायचो. एक बिहारी मुलगा हे शब्द खूप अभ्यासपूर्ण समजून घ्यायचा. तो त्या मराठी वातावरणातील मालिकेत संपूर्ण मिसळून गेला होता. तो मराठी वाटला होता अशी आठवण लाटकर यांनी पुढे बोलताना सांगितली. तो फोन करूनही संवाद समजून घ्यायचा. तो अतिशय नम्र, मोकळा अभिनेता होता हे मला त्याच्या वागण्यातून नेहमी जाणवत असे. मला त्याचे नेहमी कौतुक असे, नेहमी सकारात्मक वृत्तीचा, यश मिळूनही पाय जमीनीवर असलेला, गॉड फादर नसलेला सेल्फ मेड मॅन असलेला अभिनेता होता. नटांचे पडद्यावरचे आणि प्रत्यक्षातले हास्य हे वेगळे असते, पण तो मात्र निर्मळ मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावरील 'स्माईल'चे लाखो चाहते होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचे 'स्माईल' हे मात्र निर्मळ होते असे लाटकर यांनी सांगितले. त्याच्या आठवणींना उजाळा देताना लाटकर म्हणाले की, सुशांतने दोन वर्षांनी पवित्र रिशता ही मालिका सोडली. त्यांनंतर अडीच वर्षे आमची भेट नव्हती. मी एका मालिकेसंदर्भात अंधेरी येथील कॉफीशॉपमध्ये बसलो होतो, त्यावेळी सुशांतचा 'काय पोछे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. थोड्यावेळाने त्या शॉपमध्ये सुशांत आला, मी त्याला पाहिले खरे पण त्याच्याकडे जायचे कसे हा प्रश्न होता थोड्यावेळाने त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो अतीशय नम्रपणे माझ्याकडे येऊन 'क्या सर कैसे हो?' असे विचारत चार ते पाच मिनिटे गप्पा मारून तो ठेथजन निघाला आणि ती शेवटची भेट कायम स्मरणात राहिली.

टॅग्स :thaneठाणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या