शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आईस्क्रीम, कुल्फी विक्रीतून तरूणांना मिळतो रोजगार

By admin | Updated: May 23, 2017 01:24 IST

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे गावपाड्यात आईस्क्रीम, कुल्फी विकून अनेक तरूण सध्या रोजगार मिळवित आहेत. उन्हाळा आला की थंडगार पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते

शशिकांत ठाकूर । लोकमत न्यूज नेटवर्ककासा : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे गावपाड्यात आईस्क्रीम, कुल्फी विकून अनेक तरूण सध्या रोजगार मिळवित आहेत. उन्हाळा आला की थंडगार पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते. मात्र खेडयापाडयात आदिवासी भागात थंड पदार्थ कोठून मिळणार? मात्र बेरोजगार तरूण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हाळयात अनेक किलोमीटर आईस्क्रीमची गाडी ढकलत कमाई करतात. व त्यातून खेडयापाडयातील मुलांबरोबरच नागरिकांनाही थंडगार आईस्क्रीम, कुल्फीचा आस्वाद मिळतो.शहराकडे उन्हाळयात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुलर, एसी, फॅन आदि सुविधेबरोबरच शरीराला थंड करण्यासाठी फ्रीज थंडगार पाणी तसेच विविध थंडपेय मिळतात. मात्र खेडयापाडयातील मुले व नागरिक त्यापासून लांबच असतात. गरीब आदिवासी नागरिक थंडपाण्यासाठी माठाचा आधार घेतांना दिसतात. तसेच लहान मुले तर दुपारच्या वेळेस नदी, नाल्यात डुंबतांना दिसतात.खेडयापाडयात आईस्क्रीम , कुल्फी विकून स्थानिक तरूणांबरोबरच परराज्यातील तरूणही उन्हाळयात रोजगार मिळवतात. उत्तर प्रदेशातील ताराखुर्दे येथील उमाशंकर निशाद, व बाबुराव निशाद हे दिवसभर अनेक कि.मी.आईक्रीमची ढकलून दिवसाकाठी ३०० ते ३५० रू. कमवतात. यामध्ये खेडयातील मुलांना परवडणारी २ रू. ५ रू. किंमतीचे असे ७०० ते ८०० आईसफ्रूट दररोज विकतात. तर एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ असल्यास दिवसभर जास्त भटकंती करण्याची गरज नाही कारण लग्नातच आईस्क्रीमची मोठी विक्री होत असल्याचे उमाशंकर यांनी सांगितले. तसेच उन्हाळयात ४ महिने आपण हे काम करीत असून ४ महिन्याला साधारण ३० ते ३५ हजाराची कमाई करीत असल्याचेही त्यांनी सांगितले व पावसाळयात घरी शेतीची कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.