शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राचे कर्मचारी वेतनाविना

By admin | Updated: January 14, 2017 06:07 IST

सरकारच्या बालस्वास्थ्य योजनेंतर्गत पालिकेच्या आरोग्य केंद्रात मागील १० वर्षे नियमित सेवा करणाऱ्या ४५ परिचारिकांसह

भिवंडी : सरकारच्या बालस्वास्थ्य योजनेंतर्गत पालिकेच्या आरोग्य केंद्रात मागील १० वर्षे नियमित सेवा करणाऱ्या ४५ परिचारिकांसह ५५ डॉक्टरांना १० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आपल्या व्यथा मांडण्यासाठी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भेटीची वेळ घेऊन आलेल्या महिलांना कार्यालयाबाहेर तब्बल दीड तास ताटकळत ठेवले. आयुक्त मागील दरवाजातून परस्पर निघून गेल्याने महिला परिचारिकांनी संताप व्यक्त केला आहे.पालिका क्षेत्रात २००६ मध्ये प्रजनन व बालस्वास्थ्य योजनेंतर्गत १५ आरोग्य केंदे्र सुरू करण्यात आली. वेतनासाठी मिळणारे अनुदान कमी होत गेल्याने २०१० पासून संपूर्ण वेतनाची तरतूद पालिकेला तिजोरीतून करावी लागत होती. २०१६ च्या अर्थसंकल्पात या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद न केल्याने मार्च २०१६ पासून या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय आपली सेवा बजावावी लागत आहे.यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या पदरी निराशा पडल्याने पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आठवड्याचा वेळ मागून घेत पुन्हा भेटीला बोलवले होते. त्यांना कार्यालयाबाहेर दीड तास ताटकळत ठेवून आयुक्त कार्यालयाच्या कक्षात बसलेल्या महिला परिचारिका, डॉक्टर यांना न भेटताच अ‍ॅण्टी चेंबरच्या मागील दारातून निघून गेले. ते जात असताना काही महिला कर्मचारी आयुक्तांच्या भेटीस धावल्या. (प्रतिनिधी)