शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयूपीच्या घरांच्या मागणीला जोर

By admin | Updated: August 13, 2015 23:16 IST

कृष्ण निवास इमारत दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली असून येथील रहिवाशांना दोस्तीच्या घरांमध्ये शिफ्ट केले

ठाणे : कृष्ण निवास इमारत दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली असून येथील रहिवाशांना दोस्तीच्या घरांमध्ये शिफ्ट केले जात आहे. परंतु, आता या घरांची क्षमताही संपत आली असून आता येथे केवळ ३०० सदनिका शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने शहरातील अतिधोकादायक आणि ज्या राहण्यास अयोग्य आहेत, अशा इमारती खाली करण्यास सुरुवात केली असली तरी त्या घरातील रहिवाशांना ठेवायचे कुठे, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. शहरातील अतिधोकादायक, धोकादायक अथवा एखाद्या वेळेस इमारत दुर्घटना घडल्यास त्यामधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात दोस्तीच्या रेंटलच्या घरांत ठेवले जाते. दोस्तीच्या घरांची एकूण संख्या १४४८ एवढी असून यापैकी ११४८ सदनिका आता भरल्या आहेत. दरम्यान, नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटना घडली आणि पालिकेने शहरातील अतिधोकादायक आणि राहण्यास अयोग्य असलेल्या इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मंगळवारी झालेल्या महासभेत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात ३० वर्षे जुन्या इमारती या २५ हजार असून त्यासाठी संक्रमण शिबिरे उभारायची झाल्यास १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी ५०० हेक्टर जागा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे शक्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या शहरात असलेल्या २७०० धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये ३ लाखांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यांची व्यवस्था कुठे करायची, असा पेच सध्या पालिकेपुढे आहे. दोस्तीच्या घरांमध्ये ज्या रहिवाशांना शिफ्ट करण्यात आले आहे, त्याच रहिवाशांनी या घरांत अन्य भाडेकरू ठेवल्याची बाब उघड झाली असून आतापर्यंत ४२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच काही पोलिसांनाही या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात घरे दिली आहेत. त्यामुळे आता या घरांची संख्या कमी होऊन केवळ ३०० घरे शिल्लक आहेत. तर, बीएसयूपीची १०० घरे तयार आहेत. त्यामुळे त्या घरांमध्ये अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरता निवारा द्यावा, अशी मागणी राजकीय मंडळींकडून जोर धरू लागली आहे. यासंदर्भात पालिकेला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही घरे झोपडपट्टी भागातील रहिवाशांसाठी असल्याने ती देता येणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनापुढे इतर पर्यायदेखील खुले राहिलेले नाहीत.