शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहन समितीची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: June 10, 2015 02:40 IST

वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्या बाबत अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.

ठाणे : वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्या बाबत अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर १० दिवसांत ही निवडणूक घेणे गरजेचे होते, असे असतांनाही प्रशासनाने अद्याप या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. ठाणे परिवहन समितीमधून सहा सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी १४ मार्च २०१२ रोजी सात सदस्यांनी अर्ज भरले होते. यामध्ये काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे तीन आणि रिपाइंच्या एकाचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेतील रखडलेल्या स्वीकृत सदस्य, विशेष समिती आदी सदस्यांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. परंतु परिवहन समितीवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि सदस्यपदासाठी अर्ज करुन बसलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी मात्र आपली निवड कधी होणार याची वाट पाहत होते. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मे महिन्यात मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. त्याला मंजुरी मिळून परिवहनमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले. या प्रस्तावानुसार पुढील १० दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे होते. परंतु त्याला आता सुमारे महिनाभराचा कालावधी उलटला आहे. तरी देखील तो जाहीर झालेला नाही. सहा सदस्यांवरच कारभारठाणे परिवहन समितीवर एकूण १२ सदस्य निवडले जातात. तर स्थायी समिती सभापती पदसिद्ध सदस्य असतो. तीन वर्षापूर्वी १२ पैकी सहा सदस्य निवृत्त झाले आहेत. यामुळे सहा सदस्यांवरच या समितीचा कारभार सुरु होता. याच सदस्यांमधून दोन वर्षापूर्वी सभापतीपदाची निवडणूक घेतली होती. मात्र, वर्षभरापूर्वी या सदस्यांचीही मुदत संपली आहे. मात्र तेव्हापासून परिवहनचा कारभार हा विशेष समितीच्या माध्यमातून सुरु आहे. आधीच डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन समितीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी निवडणूक लवकर घेऊन त्या माध्यमातून कारभार सुरु करणे गरजेचे असतानाही अद्याप काहीच निर्णय न झाल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.