शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एकादशी...अन दुप्पट खाशी!

By admin | Updated: July 14, 2016 01:49 IST

एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असली तरी ती प्रत्यक्षात यावी, याचसाठी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपाहारगृहे, मराठमोळ्या

ठाणे : एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असली तरी ती प्रत्यक्षात यावी, याचसाठी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपाहारगृहे, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने, मिठाईविक्रेते आणि घरगुती पदार्थ पुरवणाऱ्यांची जय्यत तयारी झाली आहे. साबुदाण्याची खिचडी, वडे, थालिपीठ याबरोबरच मिठाईचे फ्युजन, दूधदुभत्याचे पदार्थ, रताळी, फळे यांची लयलूट सुरू आहे. आषाढी एकादशीनिमित्त यंदा उपवासाची थाळी, उपवासाचे फूड पॅकेज, एकादशी पॅकेट, अशा वेगवेगळ्या कल्पना घेऊन हॉटेल-उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने सज्ज झाली आहेत. साधारणत: ७० रुपयांच्या लिमिटेड डिशपासून ‘पोटभर खा आणि तृप्त व्हा’, अशा धर्तीवर अमर्याद पॅकेजही उपलब्ध आहेत. एकादशीनिमित्त उकडलेल्या रताळ्यांपासून भाजलेल्या रताळ्यांपर्यंत कंदमुळांचे पर्याय जसे उपलब्ध आहेत, तसेच शिंगाडा, राजगिरा, भुईमुगाच्या उकडलेल्या-भाजलेल्या शेंगांचेही पदार्थ आहेत.दोन्ही वेळेस उपवास केला जात असल्याने त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांना मागणी असते, असे विक्रेत्यांनी सांगितले. उपवासाचे थालिपीठ गरमागरमच छान लागते. त्यातही काहींना शेंगदाण्याचे कूट अधिक लागते, तर काहींना त्यात बटाट्याचा कीस लागतो. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्याप्रमाणे उपाहारगृहांत पदार्थ बनवले जातात. त्यांची तयारी दोन दिवस आधीपासूनच सुरू असते. शिवाय उपवासासाठी बटाट्याचा रस्साही काही ठिकाणी मिळतो. (प्रतिनिधी)सहज तोंडात टाकण्यासाठी... : बटाटा-केळ्याचे-रताळ्याचे वेफर्स (वेगवेगळ्या आकारांतील, डिझाइनमधील), बटाट्याचा तिखट आणि गोड चिवडा, बटाट्याच्या पापड्या, पापड, साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाण्याच्या चकल्या, गूळ-शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा लाडू, चिक्की, तिळाचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, साबुदाणा-शिंगाडा पिठाचे लाडू, खारवलेला आणि साधा सुकामेवा. खासियत काय? : उपवासाचे बटाटेवडे, उपवासाची इडली-चटणी, डोसे, आप्पे, फिंगर चिप्स, मिसळ, नारळाचा चव-मिरची-कोथिंबीर घालून बटाट्याच्या सारणातील तिखट कचोरी, गूळ-नारळाच्या सारणाची गोड कचोरी, आलू चाट, आलू टिक्की. दह्याचा मसाला लावलेले तंदुरी आलू, उपवासाची बिस्किटे, शिंगाडा-शेंगदाणा नानकटाई.