शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

आठवडेबाजार १४ वर्षांनंतर बंद

By admin | Updated: August 13, 2015 23:15 IST

ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या

ठाणे : ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या या बाजारांवर कारवाई करून ते कायमचे बंद केले आहेत. रहदारीला होणारा अडथळा, महिलांची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे ते बंद करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार, ही कारवाई केल्याची माहिती महापालिकेने दिली. हे बाजार बंद झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांबरोबर फेरीवाल्यांना देखील बसला आहे. परंतु, यामुळे गावगुंड आणि जागा भाड्याने देणाऱ्यांचा धंदाही बंद झाला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भेनाका येथे भरणारा आठवडाबाजार हा कळवा-बेलापूर पट्ट्यातील एकेकाळचा सर्वात मोठा बाजार मानला जात होता. ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा यासारख्या पट्ट्यातील गरीब कामगार, मजुरांची तेथे जत्रा भरत होती. फार पूर्वीपासून या बाजारांचे लोण पसरले होते. गावांमध्ये बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आणि यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना जागा भाड्याने मिळू लागल्या. या कामगारवर्गासाठी कपड्यांपासून गृहोपयोगी साहित्य, भाजीपाला, खाद्य-पेय, भांडी, खेळणी, स्त्रियांचे विविध प्रकारचे अलंकार आदी वस्तू स्वस्त दरात या बाजारांत उपलब्ध झाल्या. त्यामुळेच ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांतील आठवडाबाजार वेगळे महत्त्व राखून आहेत. मात्र, आठवड्यातील एका दिवसाकरिता भरणारे हे बाजार स्थानिक गुंडांच्या हप्तेखोरीचे साधन बनू लागले होते. या बाजारांत पदपथांवरील जागांचे दरही ठरू लागले होते. मोक्याची जागा मिळवायची असेल तर गल्लीगुंडाला हप्ता देण्याचा पायंडा पडला आणि पुढे महापालिका, पोलीस यांच्यापर्यंत ही साखळी तयार झाली होती. ठाण्यातील अरुंद रस्त्यांवर भरणारे हे बाजार शहरातील इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले होते. २००८ च्या सुमारास महापालिकेने याला बंदी घातली होती. त्यानंतर, २००९ मध्ये पुन्हा ते सुरू झाल्याने त्याला हप्तेखोरांचे कवच लाभले होते.