शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ईद, दत्तजयंती, नाताळ उत्साहात

By admin | Updated: December 25, 2015 02:05 IST

मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद, हिंदू धर्मीयांची दत्त जयंती व ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हे सर्व सण लागोपाठ आल्याने पालघर जिल्ह्यात ते उत्साहात आणि सलोख्याने साजरे झाले.

पारोळ : मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद, हिंदू धर्मीयांची दत्त जयंती व ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हे सर्व सण लागोपाठ आल्याने पालघर जिल्ह्यात ते उत्साहात आणि सलोख्याने साजरे झाले. मिरवणूका, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना सभा, कार्निव्हल याची एकच धूम संपूर्ण जिल्ह्यात होती. दिवाळीनंतर नाताळ हा वसईत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण. तसेच पेल्हार, सोपारा, नवजीवन पापडी, विरार, वसई या भागांत मुस्लीम धर्मीय राहत असल्याने त्यांनी धार्मिक झेंडे व पताका बांधून राहती जागा सुशोभित केली. वसईत ख्रिश्चनांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने आपापल्या घरांत नाताळचा गोठा व आकर्षक रोषणाई केल्याने या परिसराला दुसऱ्या दिवाळीचे स्वरूप आले होते. दत्त जयंती याच दिवशी असल्याने ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, असा दत्तनामाचा जयघोष मंदिरांतून कानांवर पडत होता. ब्रह्मा, विष्णू, महेश असे रूप असलेल्या दत्तगुरूचे नामस्मरण करत अनेक ठिकाणी पूजेचे आयोजन केले होते. हे तिन्ही सण एकत्र आल्याने ते उत्साहाने साजरे होत असल्याने वसईत धार्मिक एकोप्याचेही दर्शन झाले. वाडा : या तालुक्यात सुन्नी मुस्लीम बांधवांकडून आज मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस वाडाशहर, कुडूस, खानिवली, वडवली, नारे या मुस्लीम वस्ती असलेल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुस्लीम बांधवांसाठी शुभेच्छा, बॅनर्स, पताका, झेंडे, आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. वाडा शहरात खंडेश्वरी नाका ते मज्जीदनाका अशी रॅली काढण्यात आली होती. कुडूस नाक्यावरून रॅली काढून ही रॅली संपूर्ण कुडूस गावात फिरविण्यात आली. नारा, वडवळी, गावांच्यावतीने वाडा - भिवंडी महामार्गावरून वडवली गावात रॅली नेण्यात आली.या रॅलीत काँग्रेसचे नेते महमंद हुसेन, राष्ट्रवादीचे नुमान पटेल, रिद्वान पटेल, सफील मेमन, इकबाल मेमन, सतार मेमन आदीसह मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव रॅलीत सहभगी झाले होते. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.मनोर : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लीम बांधवांनी ईद मिलादुन्नबी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. टेणमध्ये सकाळी आठच्या सुमारास हातात झेंडे घेऊन नाते कलामचे प्रवचन करीत जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. जागोजागी शिरा, सरबत आणि खाण्याचे विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते. या वेळी मनोर पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवून वाहतूककोंडी होऊ नये म्हणून नाक्यानाक्यांवर व मिरवणुकीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ईद मिलादुन्नबीनिमित्त जामा मशीद ते अशिया मशिदीपर्यंत आणि मनोर जामा मशीद ते मनोर बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे असे दोन भव्य जुलूस (मिरवणूक) मुस्लीम बांधवांनी काढले. त्यात लहान मुलांचाही समावेश होता. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला संदेश शांतता ठेवणे, चांगले कर्म करणे, नमाज अदा करणे, कुराणचे वाचन करणे, अनाथ, विधवा, गोरगरिबांना मदत करणे, अशा अनेक गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्यात आली.