शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

आजदे तलावात अचानक आॅक्सिजन वाढला तेव्हा...

By admin | Updated: December 23, 2015 00:35 IST

वाढलेल्या प्रदूषणामुळे औद्योगिक निवासी परिसरातील नैसर्गिक आजदे तलावात आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचा खळबळजनक अहवाल सोमय्या पर्यावरण

डोंबिवली : वाढलेल्या प्रदूषणामुळे औद्योगिक निवासी परिसरातील नैसर्गिक आजदे तलावात आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचा खळबळजनक अहवाल सोमय्या पर्यावरण प्रयोगशाळेतून आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नेमका उलटा अहवाल दिला आहे. त्यांच्या अहवालात आॅक्सिजनचे प्रमाण मात्र झपाट्याने वाढल्याने या व्यवस्थेला नेमका कसा आणि कुठे ‘आॅक्सिजन’ मिळाला, त्याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. नेमका कोणाचा अहवाल खरा मानायचा, असा संभ्रम निर्माण झाला आहे.नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यामुळे आजदे तलाव प्रसिद्ध आहे. या तलावात गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे, तर नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तींचे विसर्जन झाले. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या या मूर्तींमुळे तलाव इतका प्रदूषित झाला, की आॅक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. त्यातून आॅक्टोबरमध्ये तलावातील मासे मरुन पडले.त्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी प्रदूषण मंडळाकडे धाव घेतली. मंडळाने पाण्याचे नमुने घेतले. त्यांचा अहवाल लवकर येत नसल्याने नलावडे यांनी सोमय्या कॉलेजच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाण्याचे नमुने तपासायला दिले होते. त्याचबरोबर विरारच्या विवा या खाजगी प्रयोगशाळेतही ते तपासण्यात आले. विवा व सोमय्यातून आलेल्या अहवालात पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचे आढळून आले. शास्त्रीय निकषानुसार ते चार मिलीग्र्रॅम आवश्यक होते. सर्वात उशिरा आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात मात्र हे प्रमाण ३.२ मिलीग्रॅम आढळले. जर हा अहवाल खरा असेल तर मग मासे का मरण पावले, असा सवाल नलावडे यांनी केला आहे.