शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीचे लक्ष्य न गाठल्याने ७० टक्केच मिळणार पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची वसुली केली असा ठपका ठेवत आयुक्तांनी वसुलीच्याप्रमाणात ७० टक्के पगार काढण्याचे आदेश विभागप्रमुख उपायुक्त मदन सोंडे यांना दिले आहेत. याप्रकाराने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाल्याने पगार नको अशी भूमिका घेतली आहे.

कोरोना काळात मालमत्ता कर बिले सहा महिने उशिराने गेल्याने ऑक्टोबर महिन्यानंतर खऱ्या अर्थाने विभागाची वसुली सुरू झाली. दरम्यान विभागाच्या कर निर्धारक संकलकपदी जेठानंद करमचंदानी यांची नियुक्ती केली. तर विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार सोंडे यांच्याकडे देण्यात आला. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळ असल्याने नागरिकांना सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत ७१ कोटींची वसुली केली. गेल्यावर्षी विभागाची ७७ कोटींची वसुली झाली होती. कोरोना काळातही गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याबद्दल विभागाचे कौतुक होत आहे.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मात्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण केले नाही असा ठपका ठेवला. सुट्टीवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी सोंडे यांना मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुलीच्या प्रमाणात ७० टक्के काढण्याचे तोंडी आदेश दिले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशनव्हे सोंडे यांनी करमचंदानी यांना विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ७० टक्के प्रमाणात वेतन बिल लेखा विभागाला पाठविण्यास सांगितले. याप्रकाराने विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. कोरोना काळात घरोघरी जाऊन कोणतीही सक्ती न कारण अवघ्या काही महिन्यात ७१ कोटींची वसुली करूनही ७० टक्के पगार देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला पगार नको, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत पगाराचे बिल पाठवू नका, अशी विनंती केल्याची माहिती करमचंदानी यांनी दिली.

-------------------

कर्मचारी संघटना आक्रमक

महापालिका मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी आयुतांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. सोमवारी आयुक्त सुट्टीवरून परत आल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतरही त्यांनी भूमिका बदलली नाहीतर, संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.