शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील प्रवासी ‘लायनीवर आले हो...’

By admin | Updated: September 11, 2016 02:22 IST

लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये शिरल्यावर ती रिकामी दिसली तरी त्यामध्ये प्रवेशाकरिता गर्दी, धक्काबुक्की करणारे आणि भांडण ओढवून घेणारे डोंबिवलीकर

डोंबिवली : लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये शिरल्यावर ती रिकामी दिसली तरी त्यामध्ये प्रवेशाकरिता गर्दी, धक्काबुक्की करणारे आणि भांडण ओढवून घेणारे डोंबिवलीकर, अशी येथील प्रवाशांची दुर्दैवाने ओळख झाली आहे. मात्र रेल्वे प्रवासी मित्रांनी डोंबिवलीकरांना ‘लायनीवर आणलेय’ सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात रांग लावून शिस्तीत प्रवासी डोंबिवली लोकलच्या डब्यात प्रवेश करतात.रेल्वेने प्रवास करताना होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ईगल ब्रिगेड दामिनी पथका’ने या उपक्रमाकरिता पुढाकार घेतला आहे. त्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकावर राबवण्यात येणारी क्यू सिस्टीमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही पद्धत सकाळी ७.३० ते १०.३० या गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी महिला प्रवाशांनी मागणी केली आहे.डोंबिवलीतील नोकरदारांची वस्ती आता दूरवर पसरली आहे. रिक्षा पकडण्याचे दिव्य केल्यानंतर डोंबिवलीकरांना रस्त्यामधील खड्ड्यांचे विघ्न पार पाडावे लागते. त्यानंतर रिक्षावाल्यासोबत सुट्ट्या पैशांवरून होणारा ‘सुखसंवाद’ उरकून घाईगर्दीत रेल्वे स्थानक गाठल्यावर मध्य रेल्वे विस्कळीत असल्याची ‘रोज मरे, त्याला कोण रडे’ ही अनुभूती येते. साहजिकच लेटमार्क व पर्यायाने तीनवेळा उशिर झाल्याने अर्ध्या दिवसांची रजा न गमावण्याकरिता डोंबिवलीकर स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दिसताच अंगात वीरश्री संचारल्यासारखा बॅग पाठीला अडकवून डब्यात उडी मारण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावतो. त्यामुळे धक्काबुक्की, चेंगराचेंगरीचे प्रकार घडतात. महिलाही ‘मेरी ट्रेन नही छुटने दुंगी’ अशा थाटात महिलांच्या डब्याला लोंबकळतात. या गोंधळात अनेकदा अपघात होतात. त्यात अनेकांना जीव जातो तर काहींना कायमचे अपंगत्व येते.आता रांगेने त्याच लोकलच्या त्याच डब्यामध्ये प्रवेश केल्यास धक्काबुक्की, चेंगराचेंगरी न होता शर्टाची इस्त्री न विस्कटता प्रवास होऊ शकतो याचा अनुभव अनेक डोंबिवलीकरांना आला. या उपक्रमामुळे अपघातांमध्ये अंशत: घट होईल आणि डोंबिवलीकरांचा व त्यांच्या सहप्रवाशांचा उच्च रक्तदाब आटोक्यात आणणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या डोंबिवली लोकल ज्या २क्रमांकाच्या फलाटात येतात त्या ठिकाणी ‘रांग संस्कृती’ सुरु आहे. आगामी काळात फलाट क्र. ३ वर आणि फलाट क्र. ५ वर ही संस्कृती रुजवण्याची मागणी महिला प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)