शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्कायवॉक आजपासून बंद

By admin | Updated: November 17, 2016 07:13 IST

नागरिकांच्या आग्रहाखातर केवळ दिवाळी निमित्त खुला केलेला डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक उर्वरित छताच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा बंद होणार आहे.

डोंबिवली : नागरिकांच्या आग्रहाखातर केवळ दिवाळी निमित्त खुला केलेला डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक उर्वरित छताच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा बंद होणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे.अर्धवट छताचे काम करण्यासाठी ठेकेदाराने दिलेल्या कालावधीपेक्षा दोन महिने अधिक काळ घालवला, तरीही ते काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उरलले काम करण्यासाठी पुन्हा स्कायवॉक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अभियंते प्रशांत भुजबळ यांनी दिली. पालिका ते स्टेशनदरम्यानच्या या स्कायवॉकच्या अर्ध्या भागाचेच काम झाले आहे. उरलेल्या भागाचे काम आता हाती घेतले जाईल. कल्याणच्या दिशेचा पूल आणि स्थानकातील मधमयभागी असलेल्या पुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचेही काम यावेळी केले जाईल. त्यात लाद्या बदलणे, छत उभारण्यासाठी खांब टाकणे. छताचे काम, दिवे बसवणे अशी कामे केली जातील. स्कायवॉकच्या पश्चिम दिशेकडील मार्गिकेचे काम आधी मार्गी लावण्यात आले आहे. तेथे तिरंगी दिव्यांची योजनाही केली होती. रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील रेल्वे पुलालगतच हा स्कायवॉक असल्याने त्यावरुन जा-ये करणे नागरिकांना सोपे जाते. (प्रतिनिधी)