शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-पुणे बससाठी पक्ष सरसावले

By admin | Updated: May 9, 2017 01:05 IST

प्रवाशांची मागणी असूनही डोंबिवली-पुणेदरम्यान शिवनेरी, व्होल्व्होसारखी सेवा देण्याकडे एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : प्रवाशांची मागणी असूनही डोंबिवली-पुणेदरम्यान शिवनेरी, व्होल्व्होसारखी सेवा देण्याकडे एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा मांडत एकंदरीतच एसटी स्टॅण्डच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने बोट ठेवताच डोंबिवलीतील राजकीय पक्ष प्रवाशांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. आपल्याच पक्षाकडे परिवहन खाते असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी तातडीने हा प्रश्न हाती घेत मंगळवारी एसटी स्टॅण्डची पाहणी करण्याचा निर्णय घेतला, तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही हा प्रश्न सोडवण्यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले.‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’ या मालिकेअंतर्गत बस स्थानकाच्ंया दुरवस्थेवर प्रकाश टाकणारे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यातच डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात असूनही तिला एसटीकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा मुद्दाही समोर आला. त्याची गंभीर दखल वेगवेगळ््या राजकीय पक्षांनी घेतली. शिवसेना, मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करुन ही मागणी लावून धरण्यात येईल, असे जाहीर केले. डोंबिवली-पुणे बस सेवेसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी दिली.एसटीतर्फे दर पंधरा मिनिटांनी दादर-पुणे, तर दर अर्ध्या तासाने ठाणे-पुणे बस चालवली जाते. त्याच धर्तीवर डोंबिवली-पुणे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे. डोंबिवली बस स्थानक रेल्वे स्टेशनपासून लांब आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील बस प्रवाशांना छोट्या प्रवासासाठीही निवासी भागात बस पकडण्यास जावे लागते. बस स्थानकात येणाऱ्या बसेस पूर्व भागात स्टेशन परिसरातील इंदिरा गांधी चौक अथवा बाजीप्रभू चौकात आल्यास त्या प्रवाशांचा, तसेच शहरात राहणाऱ्या प्रवाशांचा फेरा वाचेल, याकडे शिवसेना लक्ष वेधणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी प्रवाशांची मागणी ‘लोकमत’ने उचलून धरल्याचे सांगितले. खाजगी बसेस डोंबिवली-पुणे प्रवासात बक्कळ पैसा कमावतात. पण एसटीने येथे बससेवा सुरु केल्यास प्रवाशांना सुरक्षित आणि ठरलेल्या भाड्यात प्रवास करता येईल. त्यासाठी मनसे पत्रव्यवहार करणार आहे. डोंबिवली बस डेपो सुसज्ज करण्यासाठीही मनसे पाठपुरावा करेल. परिवहन व पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करावी, असा आग्रह कदम यांनी धरला.डोंबिवलीतील अनेक तरुण कामानिमित्त पुण्यात कार्यरत आहेत. त्यांचे पालक मुंबईत जॉब करतात. त्यामुळे ते डोंबिवलीत राहतात. डोंबिवली-पुणे बससेवा सुरु झाल्यास पालकांना त्यांच्या मुलांना सुट्टीच्या दिवशी भेटण्यासाठी बसने जाता येईल. तर मुलांनाही पुण्याहून डोंबिवलीला बसने येऊन पालकांची भेट घेता येईल, याकडे मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी लक्ष वेधले. डोंबिवलीतील काही मंडळीचे सेकंड होम पुण्याला आहे, तर काही निवृत्तीनंतर पुण्याला राहण्यास गेले आहेत, त्यांनाही ही बस सोयीची आहे.