शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

भूतानच्या मार्शल आर्ट स्पर्धेत डोंबिवलीचा झेंडा फडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 19:01 IST

भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.             

ठळक मुद्देइंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडलीदेशातून जवळपास 550, तर महाराष्ट्रातून 150 खेळाडू सहभागी झाले

डोंबिवली : भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.             भूतान येथील थिंपू शहरात भूतान इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट संस्थेने 19 ते 20 मे दरम्यान आयोजित केलेली इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इतर देशांतून जवळपास 550, तर महाराष्ट्रातून 150 खेळाडू सहभागी झाले होते. डोंबिवलीच्या युनीटी मार्शल आर्ट सेंटरमधून 8 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या क्लबचे प्रशिक्षक सुनिल वडके यांच्या मार्गदर्शनाखाली या 8 खेळाडूंना घवघवीत यश प्राप्त झाले. यातील निनाद उपाध्ये याने रौप्य व कांस्य, अभिषेक बेळगावकर याने रौप्य व कांस्य, ऋतुजा वाबळे हिने सुवर्ण व कांस्य, सृष्टी भारवे हिने रौप्य व कांस्य, हिमकेश झांजे याने सुवर्ण व रौप्य, सोयल शेख याने सुवर्ण व कांस्य, सिद्धांत कांबळे याने रौप्य व कांस्य आणि कोमल गोपाळ हिने सुवर्ण व कांस्य अशा पदकांची लयलूट केली. मंगळवारी डोंबिवलीत आगमन झाल्यानंतर पदक विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या संदर्भात माहिती देताना युनीटी मार्शल आर्ट सेंटरचे प्रशिक्षक सुनिल वडके म्हणाले, पश्चिमेतील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदानाजवळ असलेल्या सरस्वती हायस्कुलमध्ये मार्शल आर्ट्सचे सेंटर चालविले जाते. रात्री 9 ते 11 या वेळेत विजेत्या खेळाडूंनी कठोर परिश्रम घेतले. या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले आहे. इंडियाच्या टीममधून भाग घेऊन देशाचे नाव उज्वल करण्याचे ध्येय गाठण्यासाठी या खेळाडूंकडून खडतर परिश्रम करवून घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSportsक्रीडाkalyanकल्याण