शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मालमत्ताकर बिलांबाबत डोंबिवलीकर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

कल्याण: डोंबिवलीच्या एमआयडीसीतील निवासी भागात वाढीव मालमत्ताकर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाल्यानंतर वितरीत केलेल्या सुधारित बिलांची रक्कम ...

कल्याण: डोंबिवलीच्या एमआयडीसीतील निवासी भागात वाढीव मालमत्ताकर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाल्यानंतर वितरीत केलेल्या सुधारित बिलांची रक्कम १५ ते २० टक्केच कमी झाल्याने रहिवाशांची घोर निराशा झाली आहे. यावर हरकत घेतल्यावर बांधकाम क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याचे कारण देऊन बांधकाम परवानगी, वापर आणि पूर्णतेचा दाखला, मंजूर नकाशा, सुधारित बांधकाम परवानगी/पूर्णतेचा दाखला या कागदपत्रांच्या प्रती ७ दिवसांत देण्यास केडीएमसीने सांगितले आहे. ती तत्काळ देणे शक्य नसून मनपाचा हा वेळकाढूपणा असल्याचा आरोप करून सुधारित बिले देण्याची मनाची इच्छा नसल्याची शंका रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निर्णयानुसार सुधारित बिलातील रक्कम पूर्वीच्या बिलापेक्षा अंदाजे ५० टक्के किंवा त्याहून कमी होणार होती. परंतु, तसे न झाल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. यावर २०१५ मध्ये २७ गावे मनपात समाविष्ट झाल्यानंतर नियमाप्रमाणे पहिली दोन वर्षे २०१५/१६ आणि २०१६/१७ यावर्षी ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणे बिले पाठविली. परंतु, आता त्यावर्षीची बिले पण केडीएमसीच्या सुधारित कर आकारणीप्रमाणे धरून त्यातील बिलांची फरकाची असलेली रक्कम सुधारित बिलात समाविष्ट केल्याचे स्पष्टीकरण मनपाने दिले होते. परंतु, मार्च महिना संपत आला तरी ७५ टक्के सोसायटी, बंगलेधारकांना अद्याप सुधारित बिले मिळालेली नाहीत. आतापर्यंत दिलेल्या बिलांबाबतही रहिवाशांच्या तक्रारी आहेत. २००२ नंतर कुठलेही वाढीव बांधकाम केलेले नसताना नव्याने नोटिसा पाठविल्याने रहिवाशांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे. त्यातच मनपाने उपरोक्त कागदपत्रे मागितल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मनपाने कोलब्रो कंपनीकडून घरांची मोजणी/सर्वेक्षण केले होते. ती केल्यानंतर त्याचा पुरावा किंवा पोहच मागितली असता ती देण्यात येत नव्हती. अनेक घरांची मोजणी दुसऱ्यांदा केली होती. त्याचे कारण विचारले असता पहिले मोजणी केलेले पेपर मिळत नसल्याचे सांगितले होते. तर अजूनही ५० टक्के पेक्षा अधिक घरांची मोजणी केलेली नाही. या सर्व कारणांमुळे या मोजणीच्या कामावर रहिवाशांचा विश्वास राहिलेला नाही.

मालमत्ता कर आकारणी बिले कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी काढून नोटिसा पाठवल्या जात आहेत. जुनी माहिती मागणे हा सर्व वेळकाढूपणा आणि त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी केला आहे. यासंदर्भात कर निर्धारक व संकलक विभागाचे विनय कुलकर्णी यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

------------------------------------------------------