शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारास थकीत बिल अदा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:16 IST

अनेक बसची दुरुस्तीच नाही : कर्मचारी संघटनेचा आक्षेप, १२८ बसच्या देखभालीचे तीन वर्षांसाठी दिले होते कंत्राट

कल्याण : कोट्यवधी रुपयांचे बिल थकल्याने कंत्राटदाराने वार्षिक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट (एएमसी) बंद केले असले तरी कंत्राटदाराला दिलेले उद्दिष्ट त्याने पूर्ण केलेले नाही. त्याचा परिणाम बसच्या संचालनावर झाला आहे. त्यामुळे कंत्राटदाराचे थकीत बिल अदा करू नये, असे पत्र महानगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेने परिवहनचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांना दिले आहे.

केडीएमटीच्या उपक्रमातील जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या १०८ बस व पूर्वीच्या टाटा मेक २० मोठ्या बस, अशा एकूण १२८ बसच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट (एएमसी) देण्यात आले होते. तीन वर्षांसाठी दिलेले हे कंत्राट १ मार्च २०१९ पासून सुरू झाले होते. १२८ बसपैकी सुस्थितीतील ९५ बसदुरुस्तीसाठी उपक्रमाकडून दिल्या गेल्या होत्या. परंतु, तीन कोटी रुपयांचे बिल केडीएमटीकडून थकल्याने कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नव्हता. कंत्राटदाराकडून कंत्राट बंद करण्यासंदर्भात केडीएमटीला आगाऊ नोटीस देण्यात आली होती. त्यात देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, असा ठपका उपक्रमाने ठेवल्याने संबंधित कंत्राट डिसेंबरअखेर बंद करण्यात आले. दरम्यान, कंत्राटदाराने त्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सध्या ४० ते ५० बसच रस्त्यावर धावत असल्याचा मुद्दा कामगार कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे. कंत्राटदाराने अटीशर्तींचा भंग केल्याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.वाहक कंत्राटावरही आक्षेपकंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या वाहकांना स्टॅण्ड बुकिंगसारखी कामगिरी देऊन कंत्राटदार बिले वाढवित असल्याचा आरोपही कामगार-कर्मचारी संघटनेने केला आहे. प्रत्यक्षात उपक्रमात असणाऱ्या कर्मचारीवर्गास पुरेल, इतकाही बसताफा नसताना कंत्राटावर वाहक नेमून उपक्रमाच्या खर्चात एकप्रकारे वाढ होत असल्याकडे संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पंडित यांनी लक्ष वेधले आहे. याची रीतसर विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेने खोडके यांच्याकडे केली आहे.