शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला आश्वासन नको... आमची घरे द्या...!

By admin | Updated: December 8, 2015 00:19 IST

‘आम्हाला तुमची आश्वासने नको, आम्हाला आमची घरे द्या...!’, आम्ही मोलमजुरी करून पै-पै साठवून घर घेतले आहे, आता आम्ही कुठे जायचे, असा संतप्त सवाल करीत विरारमधील कारगिलनगर

पारोळ : ‘आम्हाला तुमची आश्वासने नको, आम्हाला आमची घरे द्या...!’, आम्ही मोलमजुरी करून पै-पै साठवून घर घेतले आहे, आता आम्ही कुठे जायचे, असा संतप्त सवाल करीत विरारमधील कारगिलनगर रहिवाशांनी सोमवारी वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यालयावर विराट मोर्चा काढला.वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तहसीलदार कार्यालयामार्फत महिनाभरापासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील इमारती आणि झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी सकाळी वसई तहसीलदार कार्यालयाकडून घरे तोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. यात तुमची बांधकामे अनधिकृत असून ती खाली न केल्यास १० डिसेंबरला ती तोडण्यात येतील, अशी सूचना देण्यात आली. या नोटिसांनंतर कारगिलनगरमधील नागरिक संतप्त झाले. दुपारी ३ च्या सुमारास मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनवेलपाडा रोडवरून निघालेल्या मोर्चामध्ये पुरुषांसोबत महिला तसेच मुलांचा समावेश होता. जोरदार घोषणा देत जोपर्यंत मनपा आयुक्त लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले. या वेळी महिलांनी महानगरपालिकेविरोधात घोषणा दिल्या. आम्ही लोकांच्या घरी मोलमजुरी करून घरासाठी पै-पै गोळा करून घर घेतो आणि तुम्ही १०-१२ वर्षांनी ती अनधिकृत कशी ठरवता, असा सवाल मनपाला तसेच तहसीलदार कार्यालयाला विचारला. या वेळी उपायुक्त किशोर गवस यांनी ही कारवाई व नोटीस मनपाने बजावली नसल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिका कारगिलनगरमधील चाळींवर कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिले. या वेळी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी तहसीलदार कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.