शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अंबरनाथ-बदलापूरला दुषित पाणी पुरवठा

By admin | Updated: July 29, 2015 00:06 IST

आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ

बदलापूर : आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ आणि बदलापूर शहर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्याने गेल्या आठवड्याभरापासुन दोन्ही शहरात दुषित पाणी परवठ्याचे प्रमाण वाढले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराला उल्हासनदीवरील बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केले जाते. या धरणातून पाणी उचलून त्यावर बॅरेज येथील जलशुध्दीकरण केंद्रातच प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा केले जाते. मात्र धरणातून उचलण्यात येणा-या पाण्यात मातीचे प्रमाण जास्त असल्याने या जलशुध्दीकरण केंद्रात या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे दोन्ही शहरांना दूषित आणि माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. उल्हासनदीपात्रात बदलापूरातील केमिकल कंपनीचे रसायन मिश्रीत पाणी देखील सोडण्यात येत असल्याने या पाण्यावर योग्य प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरुन शुध्दीकरण प्रक्रियेत त्रुटी असल्याचे दिसत आहे. त्यातही जलशुध्दीकरण पंपिंगची यंत्रणाही कालबाह्य झाल्याने ते बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसतो आहे.नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात: अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बॅरेज धरण क्षेत्रातच नविन २२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.मात्र या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पंिपंगची सर्व यंत्रणा उभारण्याचे काम शिल्लक असल्याने हे केंद्र सुरु होण्यास आणखी ३ महिने लागणार आहे. त्यामुळे अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी विलंब होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्यानेच आणि या यंत्रणेची क्षमता कमी असल्याने अंबरनाथ शहराला कमी पाणी पुरवठा होत आहे. नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यास शहराला २ दशलक्ष लिटर्स एवढा जास्त पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीकडून जादा पाण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात निर्णय झाल्यास अंबरनाथ पश्चिम विभागासाठी २ दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी पुरवठा मिळणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळाल्यास पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.