शेणवा : सकस आहारा अभावी कुपोषित बाळकासह कुपोषित माताही आढळून येत असल्याने कुपोषित मातावर उपचार करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यासाठी उप जिल्हा रु ग्णालयात वेगळा कक्ष सुरु करण्यात आला असल्याचे सांगून ठाणे जिल्ह्यात 60 तर पालघर जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या 109 असून पालघरपेक्षा ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य जागर कार्यक्र मात बोलताना सांगितले.आदिवासी क्र ांति सेना व भाजपा वैद्यकीय सेल यांच्या सयुक्त विद्यमाने सेव्हन हिल्स रु ग्णालयातील तज्ञ डॉकटरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य जागरचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला.ग्रामीण भागातील आदिवासी ,मागास रु ग्नाना शहरातील महागडे उपचार करणे परवडत नसल्याने स्वयमसेवी संस्थानि पुढाकार घेऊन असे कार्यक्र म आयोजित करने काळाची गरज असल्याचे यावेळी सोनावणे यांनी सांगितले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेश नगरे,वैद्यकीय अधिकारी प्रशांत कनोजा,गणपत रण,गिरीश लटके,ज्योति अय्यर,गुरु नाथ अंदाडे,रमेश भेरे,विठ्ठल धारवने,लता गगे,राजेश म्हात्रे ,बाळू वरकुटे,घनश्याम गायकवाड,रमेश फर्डे,लक्ष्मण भोईर,काशीनाथ पडवळ, नंदा चवर आदि उपस्थित होते. शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. (वार्ताहर) टाकीपठार आरोग्य केंद्रात सध्या शंतनु पाटील हे एकमेव वैद्यकीय अधिकारी असून आता अरु ण कोळी या अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली आहे. आदिवासींची सेवा निश्चितच होईल. पाणीटंचाईमुळे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी निवासस्थानात वास्तव्य करीत नाहीत-डॉ बी एस सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी
By admin | Updated: March 29, 2017 05:29 IST