शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या बिलांवरून पाणीपुरवठा अन मालमत्ता विभागात जुंपली

By admin | Updated: October 28, 2016 03:36 IST

नऊ प्रभाग समित्यांमधील नागरिकांना पाण्याची बिले चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचा मुद्दा गुरुवारच्या महासभेत गाजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अशा बिलांची

ठाणे : नऊ प्रभाग समित्यांमधील नागरिकांना पाण्याची बिले चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचा मुद्दा गुरुवारच्या महासभेत गाजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अशा बिलांची शोधमोहीम सुरू करून त्यात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु, यानिमित्ताने आता पाणीपुरवठा आणि मालमत्ताकर विभाग यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. मालमत्ताकर विभागाने ही चूक पाणीपुरवठा विभागाची असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाने मात्र मालमत्ताकर विभागाने ज्या एजन्सीला इमारतींच्या सर्व्हेचे काम दिले होते, त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने केल्यानेच चुकीची बिले गेल्याचा ठपका ठेवला आहे. गुरुवारच्या महासभेत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने १० प्रभाग समित्यांमधील बहुसंख्य नागरिकांना चुकीच्या पद्धतीने पाणीबिले येत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापौरांनी पूर्वीच्याच पद्धतीने बिले अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, आता १० प्रभाग समितीअंतर्गत सुमारे तीन ते चार हजार रहिवाशांना अशा पद्धतीने चुकीची बिले दिल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. परंतु, ही चूक आमची नसून मालमत्ताकर विभागाने नेमलेल्या आणि ज्यांनी इमारतींमधील फ्लॅटचा सर्व्हे केला, त्या एजन्सीची असल्याचा दावा केला आहे. त्यांनीच चुकीच्या पद्धतीने सर्व्हे केल्याने आमच्या विभागाकडून त्यानुसारच ती गेल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांचे जुने कोणतेही रेकॉर्डही मालमत्ताकर विभागाकडे उपलब्ध नसल्याने थकबाकी वसूल करतानादेखील अडचणी येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात मालमत्ताकर विभागाशी संपर्क साधला असता आम्ही कोणत्याही प्रकारे चुकीचा सर्व्हे केला नसल्याचा दावा केला आहे. उलट, आम्ही जो डेटा तयार केला होता, त्याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. त्यामुळे चूक आमची नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)