शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेच्या टोकनचे चक्क नगरसेवक कार्यालयातून वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीचे टोकन नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप ...

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीचे टोकन नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पालिका टोकनची काळाबाजारी करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी टोकन मोठ्या हालअपेष्टा सहन करून मिळत असताना, नगरसेवकांना पालिकेचे टोकन मिळणे गंभीर आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत महापालिकेच्या संगनमताने काही नगरसेवक, राजकारणी हस्तक्षेप करत वशिलेबाजी चालवत असल्याचे गैरप्रकार या आधीदेखील उघडकीस येऊनही महापालिका प्रशासन मात्र कारवाईऐवजी गैरप्रकारांना संरक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. त्यातच बुधवार, ८ सप्टेंबर रोजी महापालिकेने ३७ केंद्रांवर जंबो लसीकरण मोहीम ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली होती. त्यासाठी केंद्रांवर लोकांनी दिवसरात्र रांगेत उभे राहून टोकन घेतले व नंतर लस घेतली. बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर, तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत लोक रांगेत होते. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील मात्र लसीकरण केंद्रांवर दिली जाणारी टोकन स्वतःच्या खासगी कार्यालयात बसून देत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल क्लिपने उघडकीस आला आहे.

या व्हिडिओत एका व्यक्तीस पालिकेचे टोकन दिले व टेंबा येथे लसीकरण केंद्रांवर जाण्यास स्वतः पाटील यांनी सांगितले. ऑडिओ क्लिपमध्येसुद्धा मीरा रोडवरून आलेल्या एका महिलेस पाटील हे टेंबा लसीकरण केंद्रावर जा, तिथे लाइन लावायची गरज पडणार नाही, आदी वक्तव्ये करत असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे सामान्य नागरिक लस आणि टोकनसाठी रांगेत हाल सहन करत तासन्तास उभे राहतात. अनेक नगरसेवक, राजकारणीसुद्धा लसीच्या नियोजनासाठी खटपट करत असतात; पण येथे मात्र नगरसेवक पाटील हे त्यांच्या खासगी कार्यालयात बसून लससाठी टोकन देत असल्याने खळबळ उडाली आहे.

.............

व्हिडिओ निदर्शनास आला असून, आयुक्तांच्या आदेशानुसार याबाबत चौकशी केली जाईल.

डॉ. प्रकाश जाधव, पालिका प्रभारी वैद्यकीय प्रमुख.