शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ

By admin | Updated: July 9, 2017 01:44 IST

केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांमधील शाळा जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे तोंडी आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १५ जूनला शाळा कल्याणमध्ये

- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांमधील शाळा जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे तोंडी आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १५ जूनला शाळा कल्याणमध्ये प्रवेशोत्सवाच्या वेळी दिले होते. मात्र, २० दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे २७ गावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. राज्यभरातील शाळा १५ जूनला सुरू झाल्या. त्यावेळी राज्यभरात तावडे यांनी प्रवेशोत्सव साजरा केला. कल्याणमधील प्रवेशोत्सवाला खुद्द तावडेच उपस्थित होते. या वेळी त्यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. के. सी. गांधी विद्यालयात झालेल्या शैक्षणिक कार्यक्रमात २७ गावांतील शाळा महापालिकेस हस्तांतरित करण्याचा मुद्दा महापौर राजेंद्र देवळेकर व महापालिकेतील शिक्षण समितीच्या सभापती वैजयंती घोलप यांनी उपस्थीत केला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून तावडे यांनी त्यांच्या भाषणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना २७ गावांतील शाळा महापालिकेस तातडीने हस्तांतरित करण्याचे तोंडी आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही शाळा हस्तांतरित करण्याची कोणतीच कार्यवाही संबंधित विभागाने केलेली नाही. जिल्हा परिषदेकडून शाळा हस्तांतराची प्रक्रिया दोन वर्षे सुरू आहे. २७ गावे जून २०१७ ला महापालिकेत समाविष्ट झाली. तेव्हापासून शाळा हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. भाजप सरकारने महापालिकेने कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नसताना कोणताही ठराव केलेला नसताना राजकीय हेतूने २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली.त्यानंतर पुढील सरकारी कार्यवाही सरकारच्या विविध विभागांकडून झालेली नाही. त्याचाच फटका गावांतील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. २७ गावांतील शाळा आजही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे गावांतील २८ शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय साहित्य पुरवता आलेले नाही. दोन वर्षे शालेय सुविधा व शैक्षणिक साहित्याविनाच तेथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेने प्रयत्न करूनही शाळा हस्तांतरीत न झाल्याने साहित्य पुरविता आलेले नाही. सरकारी अनास्था व प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा फटका बसला आहे. त्यामुळे शाळा हस्तांतरण होणार तरी कधी, असा संतप्त सवाल पालक वर्गाकडून केला जात आहे. शिक्षणमंत्र्यांची घेणार भेट यासंदर्भात शिक्षण समिती सभापती वैजयंती घोलप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेकडून सरकारदरबारी शाळा हस्तांतरणाची फाइल पाठविली आहे. सरकार दरबारी त्याच्याकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मंत्रालयात जाऊन तावडे यांची भेट घ्यावी लागणार आहे.