शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अडीच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

By admin | Updated: May 9, 2017 00:58 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असून दरमहिन्याला ४०० जणांना चावत असल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत असून दरमहिन्याला ४०० जणांना चावत असल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे. यामुळे महापालिकेने कुत्रे निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे वर्षभरात २ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. अडीच हजारांचे त्यांचे टार्गेट असून सलग दुसऱ्या वर्षी निर्बीजीकरणाचा ठेका देण्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिले. शहरात कुत्र्यांची संख्या १५ हजारांपेक्षा अधिक आहे. कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्री १० नंतर घराबाहेर पडण्यासही घाबरतात. २०१२ च्या पशुगणनेनुसार कुत्र्यांची संख्या ३६३८ असल्याचे पालिका सांगते. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कुत्र्यांची संख्या बरीच जास्त आहे. उघड्यावरील कचराकुंड्या हे कुत्र्यांचे मुख्य ठिकाण आहे. पालिकेने १० वर्षांनी श्वान निर्बीजीकरणाची योजना राबवली. मध्यंतरी श्वान निर्बीजीकरण निविदेला ठेकेदार मिळाला नसल्याने कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. मात्र, ठेकेदार मिळत नसल्याने निर्बीजीकरणाची प्रक्रिया ठप्प पडली. अखेर, निविदेतील अटीशर्ती कमी करून श्वान निर्बीजीकरणाचा ठेका गेल्या एप्रिल महिन्यात दिला. महापालिकेकडे स्वत:चे पशू रुग्णालय व पशू वैद्यकीय अधिकारी तसेच कुत्रे पकडणारे पथक नसल्याने कुत्र्यांना आळा घालण्यासाठी व नसबंदीसाठी खाजगी ठेकेदारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका एका कुत्र्याच्या नसबंदीवर ८६० रुपये खर्च करणार पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात २५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ३० लाखांची तरतूद केली आहे.