शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

प्रीपेड रिक्षा रात्री नसल्याने गैरसोय

By admin | Updated: June 9, 2015 22:52 IST

भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे.

ठाणे : भाडे नाकारणे बंद व्हावे व महिलांना रिक्षातून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला आता महिना उलटला आहे. या सेवेचा महिलांना चांगला फायदा झाला आहे. परंतु रात्रीच्या वेळेस प्रवाशांना या रिक्षा उपलब्ध होत नसल्याने महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रात्री १० नंतर लांबचे भाडे मिळत नसल्याचे कारण प्रिपेड रिक्षा चालकांनी पुढे केले आहे. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने, प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.ठाण्यात १ मे पासून या सेवेला सुरवात झाली आहे. या योजनेला आजही फारसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. मात्र महिला प्रवाशांनी बऱ्यापैकी या रिक्षांचा वापर करायला सुरवात केली आहे. तरी ज्या उद्देशासाठी ही योजना ठाण्यात सुरु झाली तो उद्देशच सफल होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये, विशेष करुन महिला प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. अनेक महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने घरी जाण्यासाठी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त असल्याने प्रीपेड रिक्षांची सर्वाधिक गरज ही रात्री १० नंतर आहे. मात्र याच वेळेस प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत. त्याचवेळी जर प्रीपेड रिक्षा उपलब्ध होणार नसतील तर ही योजना सुरु करुन उपयोग काय? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.रात्री १० नंतर आणि दुपारी २ नंतर रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुद्धा मान्य केले आहे. प्रवाशांची वेळ आणि रिक्षाचालकांमध्ये योग्य समन्वय नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत.