शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये धुराचे साम्राज्य

By admin | Updated: March 14, 2017 01:42 IST

उल्हासनगरच्या खडी खदान डम्पिंगला आग लागून शहरभर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. सतत लागणाऱ्या आगीमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे

उल्हासनगर : उल्हासनगरच्या खडी खदान डम्पिंगला आग लागून शहरभर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. सतत लागणाऱ्या आगीमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डम्पिंग हटावची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पालिकेला पर्यायी डम्पिंग मिळेनासे झाल्याने सध्या आहे ते डम्पिंग बंद झाल्यास उल्हासनगरात जागोजाग कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती आहे.म्हारळ गावाजवळील राणा डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने पालिकेने बंद केले. डम्पिंगवरील कचऱ्याचे ढीग खालील झोपडपट्टीवर कोसळल्याने जीवितहानीचा धोका होता. पर्यायी डम्पिंग मिळत नसल्याने नाईलाज म्हणून कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथे डम्पिंग सुरू करण्यात आले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून येथे कचरा टाकण्यात येत आहे. मात्र कचऱ्याला सतत आगी लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात हजारो जीन्स कारखाने असून कारखान्यातील अ‍ॅसिडयुक्त सांडपाणी उघड्या नाल्यांत सोडण्यात येत आहे. त्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. त्याचाही उग्र वास पसरलेला असतो. नागरिकांत मळमळ, उलच्या, खाज येणे, त्वचारोगाचे प्रमाण मोठे असून क्षयरोगाचे सर्वाधिक रूग्णही याच परिसरात आहेत. यातच आता डम्पिंग ग्राऊंडच्या धुराची भर पडल्याने हा परिसर राहण्यास धोकादायक झाला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गेल्यावर्षी जीन्स कारखान्यावर बडगा उगारून कारवाईचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक आमदारासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच मनधरणी केल्याने, मंत्री महादयांनी दिलेले आदेश काही तासांत मागे घेतले. जीन्स कारखान्यांच्या प्रदूषणामुळे आणि डम्पिंगच्या धुरामुळे या भागातून स्थलांतराची संख्या वाढली आहे. या रहिवाशांनी विकलेल्या निवासी घरातही आता जीन्स पँटशी संबधित कारखाने सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)